पातनानें तीं नेपथाबाली तेलें निराळीं करावी. वाफेच्या गरमीनें ऊर्ध्व- पातन करून नेपथा निराळा करून तो प्याराफीन धुण्याच्या कामी पुनः वापरावा; व बाकी राहिलेली तेलें आसीड व अलकलीच्या योगानें इतर तेलाप्रमाणें शुद्ध करावीं. वरचेवर नेपथा स्पिरीटमध्यें प्याराफीन धुवून नंतर हा. प्रेसमध्यें दाबून जरी त्यांतील रंग व पातळ तेलकट द्रव्यें नाहींशी होतात तरी त्यांत थोडासा नेपथा स्पिरीट कायम असतोच; तो काढून टाकावा लागतो.
यास्तव तें प्याराफीन एका लोखंडी नळिका यंत्रांत घालावें व उष्ण- तेनें पातळ करावें. त्या पातळ प्याराफीनमध्ये भोकं पाडलेल्या दुसऱ्या नळींतून फार गरम केलेली वाफ सोडावी म्हणजे तें पातळ प्याराफीन जोरानें ढवळलें जातें व उष्णतेच्या योगानें त्यांतील नेपथा स्पिरीट त्या यंत्रास लागू असलेल्या नळी वाटे बाहेर पडतो. तो धरून थंड करून ठे- चावा त्या प्याराफीनला आतां नेपथा स्पिरीटचा जरापण वास येत नाहीं असें झालें म्हणजे त्यांत गरम वाफ सोडणें बंद करावें. ह्या कृतीस त्यामूळ तेलाच्या किंवा स्पिरीटच्या विशिष्टगुरुत्वाप्रमाणें व प्याराफीनमध्यें सो- डलेल्या वाफेच्या कमीजास्त गरमीच्या प्रमाणाप्रमाणानें ६ पासून १८ तास लागतात.
नंतर तें पातळ प्याराफनिमेण प्राणिज कोळशांमधून गाळावें ला- गतें. ही गाळण्याची कृती बरोबर घडण्याकरितां त्या प्याराफीनमध्ये त्यावेळेस असणारे सर्व पाणी प्रथम काढावें लागतें नंतर कोळशाची क्रिया त्याजवर करावी लागते. यास्तव तें पातळ प्याराफीन त्या नळिका यंत्रांतून काढून बाष्पवेष्टित (Steam jacketed pan) कढईत टाकावें. साबू पुस्तकांत आकृती नं. २९ मध्ये बाष्पवेष्टित कढईचें चित्र आहे. या कढईच्या वेष्टणांत (jacket ) वाफ सोडून तें मेण गरम करावें म्हणजे
पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१०२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८