Jump to content

पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७

 या रीतीनें प्याराफीन शुद्ध करण्यांत आणखी एक महत्वाची बाबद लक्षांत ठेवावी लागते ती ही कीं, 'प्याराफीन ऊन करून पातळ केल्यानंतर किती उष्णमानावर थंड करावें ? ' ऊन केलेलें प्याराफीन थंड होतांना स्फटिकीभवन होतें. थंड होण्याची क्रिया जसजशी हळूहळू होत जाईल तसतसें स्फटिकीभवन (crystallization) अधिक पूर्ण (चांगलें होतें. पूर्ण स्फटिकीभवन झालेले ह्मणजे हळूहळू थंड करून ठरलेलें प्याराफीन दाबतांना स्पंजसारखें होतें; व त्यायोगें त्या प्याराफीनमध्ये असणारे मूळचे अशुद्ध पदार्थ, त्यांत मिळविलेल्या स्पि- रिटमध्ये मिळाले जाऊन, त्या स्पिरिटबरोबर बाहेर निघून जातात, व प्याराफीन अधिक शुद्ध होत जाते. ह्मणून ऊन केलेलें प्याराफीन थंड करण्याची घाई न करितां हळूहळू थंड होऊं द्यावें.
 आतां उलटपक्षी, जलदीनें थंड केलेलें प्याराफीन चकाकीत व अर्धपारदर्शक तर नसतेंच पण त्यांतील मळकट भाग दाबानें लवकर बाहेर निघत नाहींत ह्मणून कणकीच्या गोळ्यासारखें नरम व पांढरवट असें दिसतें.
 प्याराफीन तीन वेळा दाबून काढल्यानंतर जो नेपथा बाहेर निघतो त्यांत थोडें प्याराफीन व थोडा मळ द्रवीभूत झालेला असतोच. मागें सांगितल्याप्रमाणें या नेपथा पदार्थाचा उपयोग पुनः एक किंवा दोन वेळ प्याराफीन शुद्ध करण्याकडे करावा किंवा त्यांतील नेपथा ऊर्ध्व पातनानें काढून घेऊन प्याराफीन पुनः धुण्यास सांठवून ठेवावा व राहिलेलें प्याराफीन मूळ हौदांत टाकून त्यावर प्रथमपासून शुद्ध कर- ण्याच्या क्रिया कराव्या.
 सर्व क्रियांत प्याराफीन प्रथम धुण्यास वापरलेला नेपथा दाबून काढल्यावर त्यांत हलक्या प्रतीचीं तेलें पुष्कळ असतात. म्हणून उर्ध्व-