पान:मेणबत्त्या.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
मराठी भाषेंत हुन्नरसंबंधीं पुस्तकें छापून प्रसिद्ध
करण्याच्या कामीं मदत देण्याचें विनंतीपत्र.


मराठी भाषेचा अभिमान असणारे महाराजे, राजे, सरदार,
जहागीरदार व सभ्य गृहस्थ यांचे सेवेशीं विनंती कीं -

 १ सांप्रत मराठी भाषेंत शास्त्रीय ग्रंथ होऊ लागले आहेत व त्यांस लोकाश्रयही बराच मिळत चालला आहे, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. तरी पण हुन्नर व कलाकौशल्यासंबंधी विषयांची पुस्तके मराठी भाषेत फारच थोडी आहेत. सुधारलेल्या देशांत अशी पुस्तकें एकाच विषयावर अनेक आहेत; व दररोज त्यांत नवी नवी भर पडतच आहे. अशा वेळी परके लोक अनेक हुन्नर व कलांचा अभ्यास करून दररोज नवे नवे पदार्थ तयार करतात, व अचाट संपत्ति मिळवितात. हे वाचून व ऐकून तसे पदार्थ आपण तयार करावे, अशी महत्वाकांक्षा आपल्या लोकांस सहज उत्पन्न होते व त्या सरशी असल्या हुन्नर धंद्यांची माहिती देणारी पुस्तके वाचावी असे वाटते. परंतु मराठी भाषेत तसला ग्रंथसंग्रह नसल्याने फक्त मराठी जाणणारास मोठीच अडचण पडते. ती उणीव अल्पांशाने तरी दूर करावी, या हेतुने फावले वेळांत हुन्नरसंबंधी एकेका विषयावर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचे काम आमी सुरू केले आहे. २ या कामी द्रव्याची मोठी आवश्यकता आहे व ती महाराष्ट्रियांनीच पुरी केली पाहिजे. अशी कामें राजाश्रयाशिवाय होत नाहीत असे कित्येकांस वाटते. परंतु हल्लींचे आमचे सार्वभौम इंग्रज सरकार अशा कामी उदासीन आहे. तेव्हां कोणास मदत मागावी हा प्रश्न तसाच बाकी राहतो, त्यास उत्तर एवढेच की आमचे महाराजे, राजे,