पान:मेणबत्त्या.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 लंडनमध्ये लामबेथ माशे येथें मेसर्स फील्ड आणि को यांचा मुख्य व फार जुना मेणबत्या करण्याचा कारखाना आहे. ही संस्था केव्हां अस्तित्वात आली हे जरी निश्चयात्मक ठाऊक नाही, तरी पण गेल्या सहा पिढ्यांपासून हल्लींचा मेणबत्यांचा कारखाना सुरू आहे. या कारखान्यांत अजूनही मेणाच्या मेणबत्या तयार करतात. नवीन शोधाप्रमाणे - इतर द्रव्येही मेणबत्या करण्याकडे तेथे वापरतात. परंतु मूळचा मेणाच्या मेणबत्या करण्याचा जो धंदा तो त्या संस्थेने अद्याप सोडला नाही. सन १८८५ पर्यंत इंग्लंडांतही नवीन वस्तूंचा कंटाळा करणारे लोक होते असे दिसते. त्या लोकांस ग्यास, विद्युत् , लोखंडी यंत्रे, रेलवे वगरे नव्या पदार्थांचा तिटकारा असल्यामुळे नवीन निघालेल्या स्टिअ. रीक आसिडाच्या मेणबत्त्या न घेतां जुन्या चालीच्या मेणाच्या मेणबत्त्या वरील संस्थेपासून घेत असत. इकडे हिंदु लोकांच्या पुराणप्रियतेस नांवें ठेवणारांनी लक्ष द्यावे. या संस्थेची जुनी हिशेबी पुस्तकें आहेत त्यांत सन १७०० व्या वर्षाचा हिशेब लिहिलेला सांपडतो. इतकी जुनी ती संस्था आहे. हल्ली त्या कारखान्यांत स्परम्यासिटी, स्टिअरीन, प्याराफीन, ओझोकिरीट आणि मधमाशांचे व वनस्पतिज मेण इतक्या प्रकारच्या मेणबत्त्या निरनिराळ्या रीतींनी बनविण्याचे काम चालत असते. यावरून ज्या कामासाठी मूळ संस्था स्थापन झाली, ते मूळ काम तर सुरू आहेच, मात्र त्या कामांत नवीन शोधाप्रमाणे फेरफार करून नवीन साधनांनी तोच माल उंची प्रतीचा बनविण्यांत धंद्याचा प्रामाणिकपणा व त्यांत सतत परिश्रम यांणी कारखाना कसा उर्जित अवस्थेस पोचतो याचे चांगले उदाहरण त्या संस्थेने लोकांचे निदर्शनास आणून दिले. सन १८३० मध्ये इंग्लंडांत मि० चार्लस च्याट याणी चरबी शुद्ध करून मग ती दाबून मेणबत्त्यांचे कठिण द्रव्य काढण्याच्या रीतीचे पेटंट घेतले. त्या रीतीने फक्त चरबी शुद्ध करून