पान:मेणबत्त्या.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४१

पुडक्यांची ( दरेक ३ शेर वजनाचें ) एक ओळ अशा पाहिजे तितक्या ओळी त्या बाकावर मांडतो. ६ शेर वजनाचें पुडकें असल्यास एका ओळींत १२ पुडकी ठेवतो. फार अभ्यासानें तर या यंत्रावाचूनही मेण- बत्यांची पुडकीं बांधता येतात. पुष्कळ प्रकारच्या व लहान मोठ्या आकारांच्या मेणबत्त्यांचे ढीग पडलेले असतात. त्यांतून आपणास पाहिजे त्या आकाराच्या पाहिजे तितक्या मेणबत्या चटकन घेऊन पुडकें बांधण्याचें आपणास तें काम इतक्या शिताफीनें बिनचूक व लवकर केले जातें कीं, पाहून चमत्कार वाटतो. याचे कारण या कामाचा फार व एकसारखा अभ्यास हें आहे. दरेक पुडकें ३-६ शेर वजनाचें असतें. एक हुशार पुडकीं बांधणारा मनुष्य दररोज २८८० शेर वजनाच्या मेणवत्या पुडक्यांत बांधू शकतो. बहुधा हें काम मुर्लेच करितात. कारण मुलांस मजुरी कमी पडते.

५ चिठ्या मारणे--याप्रमाणे बाकावर ठेवलेल्या दरेक पुडक्यावर

दुसरा मनुष्य एकेक छापील चिठ्ठी लावतो. ह्या चिठ्ठींत मेणबत्त्यांची जात, वजन व किंमत आणि कारखानदाराचें नांव व पत्ता इतका मज- कूर छापलेला असतो.

६ पुडकी पेटीत भरणें-तिसरा मनुष्य अशी ६१८।१०।१२

पुडकीं घेऊन एका देवदारी पेटींत भरतो. नंतर चौथा मनुष्य त्या पेट्या बंद करून खिळे मारतो आणि नंतर कोठारांत किंवा विक्रीच्या ठिकाणीं पाठवितो. या पेटीवर ही छापील चिठ्ठी, किंवा काळ्या शाईत मोठ- मोठ्या अक्षरांनीं मेणबत्त्यांची जात, वजन व किंमत आणि कारखान- दाराचें नांव व पत्ता इतका मजकूर लिहिलेला असतो. याप्रमाणें मेणबत्या तयार झाल्यावर त्या प्याक करतांना वर लिहि लेली सहा प्रकारची कामे करावी लागतात. कित्येक कारखान्यांत, १६