पान:मेणबत्त्या.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९


क्रिया--मेणबत्त्यांचे द्रव्य तयार करतांना स्निग्ध पदार्थांचे घटक, रसायन रीतीने व यांत्रिक रीतीने निरनिराळे करावे लागतात. त्यावेळेस मूळ स्निग्ध पदार्थात इतर पदार्थ मिळविणे, नंतर उष्णकरणे, शिजविणे, थंडकरणे अथवा दाबून निराळे करणे असे बरेच प्रयोग त्या मूळपदार्थावर करावे लागतात. त्या रीतीस क्रिया हे नांव या पुस्तकांत दिले आहे. विशेष माहिती पान १११, १४९, १५७ वर पहा.
दाब व उष्णता-साबू किंवा मेणबत्त्या करतांना मूळ पदार्थ किती उष्णतेवर व किती दाबाखाली शिजवावा, याची प्रमाणे अनुभवाने ठरविलेली आहेत. त्याप्रमाणे कमी जास्त वेळांत त काम पुरे होते. दाब व उष्णता यांचा एकमेकाशी प्रमाणबद्ध संबंध असतो. अमुक उष्णता दिली असतां अमुक दाब पडतो-उत्पन्न होतो, किंवा अमुक दाबाखाली शिजविणे ह्मणज अमुक अंशाची उष्णता द्यावी लागते. याचे प्रमाण ठरलल आहे. याबद्दलचे आंकडेवार कोष्टक साबू पुस्तकांत पान ३२९ वर लिहिले आहे ते पहा.
नलिका यंत्राने अर्कवत काढणे किंवा खेचणे-- उर्ध्वपातन' शद्ध पहा.
बामहायड्रामिटर-द्रवपदार्थात घन पदार्थ किती आहे, ते समज. ण्याचे यंत्र आहे. हे कांचेचें केलेले असते व त्यांत पारा भरून अशाचे आंकडे त्यावर दाखविले असतात. चित्र व विशेष माहिती साबू पुस्तकांत पान १२० वर पहा.
सापोनीफिकेशन-आल कली बरोबर स्निग्ध द्रव्याचा किंवा कोणत्याही आसिडाचा संयोग करण्याच्या क्रियेस सापोनीफिकेशन ह्मणतात. विशेष माहिती पान ७ वर पहा.