पान:मेणबत्त्या.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मेणबत्या पुस्तकांतील पारिभाषिक शब्द.

अतीउष्ण वाफ-विस्तवांत लोखंडाची नळी ठेवून ती लाल झाल्यानंतर तिच्या एका तोंडांत वाफ सोडून दुसन्या तोंडातून काढतात. त्या वाफेस अतीउष्णवाफ ह्मणतात.
अर्कल्पाने काढणे-कोणत्याही पदार्थाचा अर्क काढण्यास या रीतीचा उपयोग करितात. ज्याचा अर्क काढावायचा तो पदार्थ एका भांड्यांत घालावा. तो कोरडा असल्यास त्यांत पाणी मिळवावे, पातळ असेल तर तसाच भांड्यांत घालावा; उष्णतेने पातळ होण्यासारखा (चरबी, तूप, तेल यांची मिश्रणे) असत्यास त्यांत पाणी घालण्याची जरूर नाही. नंतर त्या भांड्यास एक नळी लावून तिचा शेवट दुसऱ्या पाणी भरलेल्या भांडयांत लागू करावा. पाणी भरलेल्या भांड्यावर झाकण ठेवावे. याच भांड्यास ग्राहक ह्मणतात. या सर्व यंत्रास नलिकायंत्र ह्मणतात. नंतर पदार्थ घातलेल्या भांड्याखाली प्रमाणशीर उष्णता देण्याचे सुरू करावे. झणजे आंतील पदार्थाची वाफ होऊन ती त्या नळीवाटे निघून ग्राहकांत जाते. तेथे ती थंड होऊ द्यावी. याप्रमाणे काम करण्याच्या रीतीस अर्करूपाने काढणे-नळिका यंत्राने अर्कवत् काढणे अथवा खेचणे-किंवा त्या पदार्थाचे उर्ध्वपातन करणे असे ह्मणतात.
आसिडिफिकेशन —तेल, चरबी व इतर स्निग्ध पदार्थावर अम्लक्रिया करण्याच्या रीतीस आसिडीफिकेशन ह्मणतात. या कामी विशेर्षे करून तीव्र सल्फ्युरीक आसीड वापरतात. विशेष माहिती पान ..९ व भाग ६ मध्ये पहा.
उर्ध्वपातन-- अर्क रूपाने काढणें ' शब्द पहा.