पान:मेणबत्त्या.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डली असतां या हौदांतील द्रव्य पातळ करता येते, व तांब्याच्या नळ्यांत थंड पाणी भरले असतां बाष्परूप पदार्थ थंड करतां येतो. ल ही लोखंडी नळी आहे. ही खच्या शेवटी जोडून ठ हौदांत सोड तात. वरून येणाऱ्या नळीने हिच्यावर छिटकाव करून हिच्यांतील शेष बाष्परूप पदार्थ खमध्ये थंड होत होत येऊन जो शेष भाग थंड न झालेला रहातो तो या नळीत थंड करतात. ठ हा लोखंडी बंद हौद आहे. यांत शेष बाष्परूप पदार्थ थंड करतात. र ही लोखंडी नळी आहे. हिच्यांत खराब जातीची निघणारी वाफ धरून चिमणींत सोडून तिचा नाश करतात. या रीतीच्या पहिल्या प्रकाराने काम करण्याची माहितीकोठारांतील स्निग्धपदार्थाच्या पिपांत वाफेची नळी सोडून तो पदार्थ पातळ करावा. नंतर पातळ स्निग्ध पदार्थ ५० मण आ या हौदांत टाकावा; तेथे थोडा वेळ स्थिर ठेवून वरचा पदार्थ भ पंपाने प हौदांत टाकावा; प हौदांतील नळीत वाफ सोडून . तेथें थोडा वेळ उकळू द्यावा; नंतर भ पंपाने आकर्षण व दाबाची क्रिया त्या पदार्थावर करून ढ त नळी वाटें तो ड भांड्यांत टाकावा; नंतर फ भट्टीत विस्तव करून अ नळी लाल करावी, बायलरमधून अ नळीमध्ये वाफ सोडावी; नंतर त्या लाल झालेल्या अनळीतील बाफ डमधील स्निग्ध पदार्थात सोडावी; व या ठिकाणी उष्णतामापक यंत्र लागू करावें, डमधील स्निग्ध पदार्थ काही वेळ [ सुमारे अर्धा तास ] ३५०° फा. अंश गरमीवर उकळू द्यावा. आतां त्या डमधील स्निग्ध पदार्थावर अम्लक्रिया करणे आहे, ती माहिती--