पान:मेणबत्त्या.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८

हे लहानसें घर ड भांड्यावर उष्णतामापक यंत्र लागू करण्यास ठेवले आहे. हा कॉक आहे. ड भांड्याच्या अर्धचंद्राकृती झाकणास तो लागू केलेला आहे. हाच कॉक उघडून ड मधील द्रव्य बाहेर काढतात. ही भट्टी आहे. हिच्यांतून अ ही नळी बाहेर काढून ड मध्ये लागू केलेली असते. या भट्टींतच अ नळी गरमीनें लाल करतात. ह्मणजे बायलरांतून हिच्यांत आलेली वाफ अती उष्ण होते. नंतर ती अती उष्ण वाफ ड मध्ये सोडतात. हा लोखंडी हौद आहे. यास आंतून शिशाची कल्हई केलेली असते. हा चोहोंकडून बंद आहे. यांतच अम्लक्रिया करण्याचे सल्फ्युरीक आसीड ठेवतात.

हा काक आहे. हा इ मधून ड भांड्यांत जाणाऱ्या नळीस इ बाहेर लागू केलेला असतो. हा कॉक उघडला असतां इ मधील सल्फ्युरीक आसीड ड मध्ये जातें.
ज ज ज ज हे लोखंडी हौद आहेत. या दरेकास आंतून शिशाची

कल्हई केलेली असते. यांत वाफ आणण्यास तळी तांब्याच्या नळ्या लागू केलेल्या असतात. ड मधील द्रव्य च कॉकनें या दरेक हौदांत येऊ शकते. यांतच थोडे थंड पाणी व सल्फ्युरिक आसीड टाकून त्यांत ड मधील अम्लद्रव्य च द्वारे सोडतात व शिजवितात.

ध ही लोखंडी नळी ढ या नळीस जोडून ह या हौदांत सोडली

आहे. ह्या ध नळीने आ मधील द्रव्य ह या हौदांत नेतां येते.

ह हा लोखंडी हौद आहे. यास आंतून शिशाची कल्हई केलेली असते. हा उंच जागेवर ठेवतात. यांत वाफ सोडण्यास एक