पान:मेणबत्त्या.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३७

हे शोषक यंत्र (पंप) आहे. पातळ पदार्थ एकीकडून दुसरीame कडे नेण्यास नळ्या जोडून यास गती द्यावी. ह्मणजे एका आ ठिकाणचा पातळ पदार्थ आकर्षण होऊन दुसरीकडे पडतो.

ढ त ही लोखंडी नळी आहे. ती भ पंपास लागू करून ड भांड्यांत सोडली आहे.
 हे अम्लक्रिया करण्याचे यंत्र ( भांडे ) आहे. हे मजबूत व तांब्याच्या पत्र्यांचे केलेले असते व लोखंडी गजावर किंवा चुनेगच्चीत बसविलेले असते. ह्यास अ द ह्या लोखंडी नळ्या व ब उष्णतामापक यंत्र ठेवण्यास घर लागू केलेले आहे. याच्या खालच्या बाजूस अर्धचंद्राकृती झाकण स्क्रूसारख्या वेढ्यांनी गच्च बसविलेले असते. हे झाकण उघडून ते ड यंत्र आंतून साफ करतात. व पुनः बंद करतात. या झाकणास च कॉक लागू केला आहे. या च कॉकनें अम्ल झालेले द्रव्य ड बाहेर काढतात. या ड भांड्यांतच अम्लक्रिया करण्यापूर्वी स्निग्ध पदार्थ अति उष्ण वाफेने ३५०° फा. अंशपर्यंत गरम करतात.
 ही लोखंडी नळी कॉकसह आहे. ही फ भट्टीतून निघून  मध्ये जाते. हिच्या वाटें अति उष्ण वाफ ड भांड्यांत सोडतात.

ही तांब्याची नळी थंड पाण्याच्या हौदांतून येते व ती ड च्या वरच्याभागी लागू केलेली असते. ड मध्ये स्निग्ध पदार्थावर अम्लक्रिया घडण्यास सुरवात झाली झणजे त्यांत वाफा उत्पन्न होतात. त्या वाफा थंड करण्यास द मधून पाणी नेऊन ड च्या वरच्याभागी शिंपडावे लागते. त्या कामी द नळीचा उपयोग करतात.