पान:मेणबत्त्या.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०

  या प्रकाराने काम करण्याची माहिती-१०० शेर स्निग्ध पदार्थ घेऊन त्यांत ३३-६० शेर गोडे पाणी मिळवावें, नंतर ढवळून तें मिश्रण त्या पंचपात्रा ( डिजेस्टर) मध्ये भरावें. पंचपात्राच्या वरचा २-३ इंच भाग रिकामा राहील इतके ते भरावे. नंतर ते भट्टीवर आडवे किंवा उभे ठेवून खाली विस्तवाची उष्णता देण्यास सुरवात करावी. आडवें ठेवले असेल तर त्यांतील सुटा पत्रा असणारी बाजू उंच करून खाली ठेवावी ह्मणजे तो सुटा पत्रा दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुनः पूर्व स्थानी येतो या योगें सर्व मिश्रण ढवळले जाते. किंवा ते उभे ठेवले असेल तर जोराने नुसतें हलवावें मणजे त्यांतील सुटी सळई इकडून तिकडे व तिकडून इकडे ढकलली गेल्याने ते मिश्रण ढवळले जाते. याप्रमाणे ढवळण्याचे काम सुरू ठेवून त्या मिश्रणाची उष्णता ६१२ अंशापर्यंत वाढवावी. नंतर त्या पंचपात्रास लागू केलेल्या उष्णतामापक यंत्रांतील पारा ६१२° फा. अंशावर आला ह्मणजे ढवळण्याचे काम वारंवार करून तीच उष्णता १० मिनिटें कायम ठेवावी. पाण्याबरोबर स्निग्ध पदार्थाचे गाढसानिध्य व ६१२° फा. अंशांची उष्णता १० मिनिटें कायम राहिली की त्या स्निग्ध पदार्थाचे मूळ घटक जे ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें जी यापूर्वी रसायनसंयोगाने एकत्र होती ती यावेळेस सुटी पडतात. व दरेकाच्या स्वतंत्र अस्तित्वास लागेल इतका पाण्याचा भाग शोषून घेऊन, यांत्रिक संयोगाने मिश्र अशा स्थितीत राहतात, हाच या रीतीचा मोठा विशेष आहे.
 दहा मिनिटानंतर खालची उष्णता बंद करून बराच वेळ ते मिश्रण निवू द्यावे. नंतर दहा फूट लांबीचा नळ स्क्रूनी या पंचपात्रास लागू करावा. यावेळी या नळाचा भाग नागमोडी आकाराचा केला असता थोड्या जागेत राहू शकतो व त्यामुळे तो ठेवण्यास लागणारा थड