पान:मेणबत्त्या.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११९

२री क्रिया-नंतर ब हौदाच्या खालच्या नळीवाटे त्या साबूखाली जमलेले पाणी व ग्लिसराईन हळूच काढून दुसऱ्या पात्रांत ठेवावें.
 ३री क्रिया-नंतर ब हौदांतील कठिण साबू खोदून काढून क हौदांत टाकावा. याचे फार मोठाले गोळे नसावे म्हणून साधारण कुटन टाकावा. नंतर २१ शेर तीव्र सल्फ्युरीक आसीड ८४ शेर गोड्या पाण्यांत मिळवून हे मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्या के हौदांतील चुन्याच्या सात हे सलफ्युरीक आसिडाचे मिश्रण मिळवावे. नंतर वाफेची किंवा विस्तवाची उष्णता दऊन हे सर्व मिश्रण तीन तास वारंवार ढवळून शिजवावे. म्हणजे त्या सातील चुना निराळा पडून रसायन रीतीने चुन्याचा सलफेट बनून त्या हौदांत तळी जमतो; व मिश्र स्निग्ध आसिडें पातळ स्थितीत त्या मिश्रणाच्या वर जमतात. असे झाले म्हणजे उष्णता बंद करून ते सर्व स्थीर ठेवावे. नंतर वर जमलेली घट्टशी स्निग्ध आसिडे काढून घेऊन दसऱ्या एका तशाच हौदांत टाकून त्यांत १९० शेर पाणी मिळवून गरम करावी. हे मिश्रण पाव तास खूप जोराने ढवळावे म्हणजे सलफ्युरीक आसिडाचा शेष भाग पाण्यांत मिळून जाऊन ती मिश्र स्निग्ध आसिडें साफ धुतली जातात. नंतर ते मिश्रण स्थिर ठेवावें ह्मणजे खाली पाणी व वर स्निग्ध आसिडें जमतात.
  ४ थी क्रिया-स्निग्ध पदार्थातील ग्लिसराईन निराळे काढून स्निग्ध आसिडें तर आपण काढली. पण या स्निग्ध आसिडांत पातळ व घट्ट अशा दोनही जातींची स्निग्ध आसिडें मिश्र आहेत. त्यांपैकी आपणास घट्ट स्निग्ध आसिड निराळे काढणे आहे. ह्मणून धुतल्यानंतर त्या पाण्यावर जमलेली ती स्निग्ध आसिडे काढून घेऊन एका लोखंडी कढईत टाकावी. ती पातळ नसल्यास तेथें गरमीने पातळ करावी.