पान:मेणबत्त्या.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११७

 (ड ड) हे टिनचे साचे लोखंडी बैठकीवर ठेवलेले आहेत. या साचांतच मिश्र स्निग्ध आसिडें २-३ दिवस ठेवून त्यांच्या वड्या पाडतात.
 (इइ) हा प्रेस (दाबण्याचे यंत्र) आहे. यांतच चवथ्या क्रियेप्रमाणे थंडा दाब (कमी उष्णमानावर) करितात.
 (फ फ) हा हायड्रालीक पंप झणजे शोषक यंत्र आहे. याच्या सहाय्याने पातळ द्रव्य एकांतून दुसऱ्या हौदांत नळी वाट नेतां येते.
 (ज ज) हा लाकडी किंवा लोखंडी तिसरा हौद आहे.
 (ह ह) हा हायड्रालीक प्रेस ( नव्या त-हेचा) आहे. पांचव्या क्रियेमध्ये जास्त दाब व जास्त उष्णता देऊन घट्ट स्निग्ध आसिडांतील पातळ स्निग्ध आसिडाचा शेष भाग काढण्याच्या कामी गरम दाब करतांना याचा उपयोग करितात.
 हा लोखंडी हौद आहे. पांचव्या क्रियेनंतर निघालेलें घट्ट स्निग्ध आसीड (स्टिअरीक आसीड ) यांतच ऊन करून पुढे त्याचे मोठाले गठे ओततात.
  याप्रमाणे या रीतीने काम करण्यास लागणारी भांडी, त्यांची आकृती व ती मांडण्याची व्यवस्था असते. याशिवाय कच्चा माल ठेवण्याची जागा या कारखान्यांतच असावी. मेणबत्या करण्याच्या द्रव्यांचे तयार केलेले मोठाले गठे निराळे जागेत ठेवावे. कोणी ह्या दोन्ही जागा जवळ जवळ बांधतात.
  या रीतीने काम करण्यांत नव्या शोधाप्रमाणे चुन्याचे प्रमाण दर शेकडा १६ पेक्षा ही कमी वापरून काम करितां येते. ह्मणून या रीतीने काम करण्याचे तीन प्रकार ठरविले आहेत. बाकीच्या दोन प्रकारांत लागणाऱ्या यांत्रिक सामुग्रीचा जो थोडासा फेरफार आहे, तो त्या त्या प्रकाराच्या वर्णनांत दाखविण्यात येईल. पहिल्या प्रकाराने काम करण्यास वर लिहिलेली सामग्री पुरी होते.