पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जीचा ध्वज होणार नाही हे त्यांनी पूर्णपणे ओळखिळे होते. कुणाचीहि पर्व न करिता, त्यांनी संस्थेवर बेधडक टीका करावयास सुरवात केली. संस्थेच्या पुढायांबद्दल त्यांना काडीमात्र आदर नव्हता. त्या सर्वाशीं कमाल यांचे वारंवार खटके उडत. अनवर, जमाल, जवाद; नियाझी ही या संस्थेची प्रमुख पुढारी मंडळी होती. ते सर्व जणू काय शाळेतील अपरिपक बुद्धचे विद्यार्थी आहेत व आपण शिक्षक आहोत अशा भावनेने कमाल त्या संस्थेच्या पुढा-यांशी बोलत. त्यांची ही वृत्ती पाहून संस्थेच्या पुढा-यांना त्यांचा तिटकारा वाटत असे. अहंमन्य आणि शिष्ट म्हणून कमाळ यांची ते संभावना करीत. कमाल यांच्या सडेतोड वृत्तीमुळे, त्यांना संस्थेच्या अंतर्गत कारभारांत स्थळ मिळालें नाहीं. तत्वाला धरून कमाल दुस-यावर टीकेचे प्रहार निर्दयपणे करीत; पण त्यांच्यावर कोणी टीका केलेली त्यांना सहन होत नसे. आपण जे करतो ते अगदी विचारपूर्वक करतो, त्यामुळे आपल्यावर टीका होता कामा नये असे त्यांना वाटत असे. आपल्यावर टीका करावयाचा हक्क फक्त आपल्या आईलाच आहे असे ते म्हणत. त्याचप्रमाणे आपल्या कार्यात कुणी ढवळाढवळ केलेली त्यांना पत्र नसे.