पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६ ) | सर्व साधारण नियम. ( १ ) एक रुपया आरंभीं प्रवेश फी देणारास मुस्लिम मराठी साहित्याचे कायम ग्राहक समजण्यात येईल. | ( २ ) कायम ग्राहकांस मुस्लिम मराठी साहित्याची प्रकाशित होणारी पुस्तके किंवा उद्देशानुसार प्रसार करण्याकरितां पसंत करण्यांत आलेली पुस्तकें मूळ किंमतीच्या पाऊणपट (तीन चतुर्थांश) किंमतीत देण्यांत येतील. सदर पुस्तकें कायम ग्राहकांनी स्वीकारावयाची आहेत. | ( ३ ) दरवर्षी सामान्यपणे मुस्लिम मराठी साहित्याची दोन किंवा तीन पुस्तकें प्रकाशिली जातील. ( ४ ) शंभर रुपये किंवा त्याहून जास्त देणगी देणारांस मुस्लिम मराठी साहित्याचे आश्रयदाते समजण्यांत येईल व त्यांना प्रकाशित होणारी सर्व पुस्तके, तहाहयांत मोफत देण्यात येतील. ( ५) पन्नास रुपये किंवा त्याहून जास्त देणगी देणारांस मुस्लिम मराठी साहित्याचे सहाय्यक समजण्यात येईल व त्यांना ब-याच मुदतीपर्यंत प्रकाशित होणारी पुस्तके मोफत देण्यात येतील. ( ६ ) पंचवीस रुपये किंवा त्याहून जास्त देणगी देणारांस मुस्लिम मराठी साहित्याचे हितचिंतक समजण्यात येईल व त्यांना ठराविक मुदतीपर्यंत प्रकाशित होणारी सर्व पुस्तके मोफत देण्यात येतील. ( ७ ) पांच रुपये आगाऊ वर्गणी देणारांस मु. म. साहित्याचे वणीदार समजण्यात येईल व त्यांना एक वर्षात (जानेवारी ते डिसेंबरपयते) प्रकाशित होणारी पुस्तके मोफत देण्यात येतील. (८) सर्व पत्रव्यवहार * चालक, मुस्लिम मराठी साहित्य, सांगली s. I c.' या पत्त्यावर करावा.