पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) हे अधिकारी वाङ्मयाचे प्रकाशन व्हावे म्हणून नाणावलेल्या हिंदु-मुस्लिम विद्वानांचे एक सल्लागारमंडळ निवडण्यात आले आहे. | मी हाती घेतलेल्या मुस्लिम मराठी साहित्याच्या अभिनव कार्यास नेक नामदार न्यायमूर्ती एम्. आर. जयकर, हिज हायनेस राजासाहेब सांगली, हरिभक्तपरायण महाराजा ऑफ देवास, मुंबई इलाख्याचे माजी मुख्य प्रधान ना. बाळासाहेब खेर, साहित्याचार्य वामन मल्हार जोशी, सुप्रसिध्द महाराष्ट्रीय मुसलमान पंडित खानबहादूर प्रो. शेख अबदुल कादिर सर्फराझ, एम्. ए., आय. ई. एस., खानबह दूर बदिउझ्झमान काझी एम्. ए., यांच्यासारख्या थोर हिंदमुसलमान महाभागांनी शुभाशिर्वाद दिले आहेत. तरी सर्व महाराष्ट्रीय बंधुभगिनींनी या माझ्या अंगीकृत कायास उत्तेजन व उदार आश्रय द्यावा व माझ्या हातून मराठी साहित्याची सेवा यशस्वी रीतीने करवून घ्यावी अशी नम्र विनंती आहे. • सर्वांचा नम्र, सय्यद अ. अमीन चालक व संपादक, मुस्मि मराठी साहित्य,