पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ )

  • आपला उद्देश प्रशंसनीय व उत्तेजन देण्याच्या योग्यतेचा आहे. मुस्लिम मराठी साहित्य, जातीय वैमनस्याचा ५श्न सोडवू शकेल अशी अपेक्षा आहे. आपल्या कार्याल माझी संपूर्ण सहानुभूति आहे.

-हिज हायनेस, महाराजा ऑफ देवास (ज्यू.) ** मुस्लिम मराठी साहित्याची योजना मला अतिशय आवडली व त्या योजनेबद्दल मी आपणांस हार्दिक धन्यवाद देतो. महाराष्ट्रांत राहणा-या प्रत्येक मुसलमान व मुसलमानेतर सदगृहस्थास तुमची योजना पसंत पडून, प्रत्येकाकडून तुह्मांस आश्रय व उत्तेजन मिळालेच पाहिज •..आपल्या साहित्यास संपूर्ण यश व सर्वत्र मान्यता मिळो आणि त्यास दर्घायुष्य लाभो असे चिंतितो." –खानबहादूर, प्रो. शेख अबदुल कादिर सफेझ, एम्. ए., आय. इ. एम्. * मुस्लिम मराठी साहित्याची कल्पना अत्यंत स्वागतार्ह आह. हिंदुस्थानांतील दोन प्रमुख जातींत समजुतदारपणा उत्पन्न करण्यास मुस्लिम मराठी साहित्यास यश मिळेल, अशी मला खात्री आहे. मि. सय्यद अमीन यांना धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत, –खानबहादूर, बदिउझ्झमान काझी, एम्. ए. " आपण हाती घेतलेल्या कार्यास स्पृहणीय यश मिळेल आणि मराठी भाषेचे पंडित' या नात्याने आपण करीत असलेल्या मराठी साहित्यसेवेचे, जातिधर्माचा विचार न करतां सर्वाकडून चीज होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. --प्रोफेसर, सय्यद अबदुल्ला, एम्. ए. ( चन्सलर्स गोल्ड मेडलिस्ट. )