पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुस्लिम मराठी साहित्य थोरांचे शुभाशिर्वाद ---x- प्रिय मि. अमीन, । “आपले कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे व ते कार्य तडीस नेण्यास आपण अत्यंत योग्य आहांत. सुबुद्ध राष्ट्राभिमानी व्यक्ति' अशी आपण महाराष्ट्रामध्ये कीर्ति कमाविली आहे आणि या कीर्तीचा आपल्या या नव्या कार्यात अतिशय उपयोग होईल. आपल्या कार्यास संपूर्ण यश इच्छितो. –नेक नामदार, न्यायमूर्ति एम्. आर. जयकर. * आपण ' मुस्लिम मराठी साहित्य' सुरू करून मराठी भाषेची व मुसलमान समाजाची तशीच हिंदु समाजाची फार मोठी सेवा करीत हांत...आपले मराठी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे आणि आपण सुरू केलेली साहित्यमाला हिंदुमुसलमान ऐक्याच्या दृष्टीनेही एक मोठा स्तुत्य प्रयत्न आहे. आपलें मी मनापासून अभिनंदन करतो.' -माजी मुख्य प्रधान, बा. गं. रखेर. * आपण संपादित असलेल्या मुस्लिम मराठी साहित्याच्या उपयुक्ततेबद्दल व होत असलेल्या कामगिरीबद्दल मला पूर्ण सहानुभूति आहे...एकंदर कार्य उपयुक्त होत आहे यात शंका नाही. आपल्या साहित्यमालेचे यश दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो. –साहित्यचार्य, प्रो. वामन मल्हार जोशी, एम्.ए.