पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अतातुर्क पावित्र्याचे पुनरुज्जीवन केले आहे आणि बदलत्या काळाच्या प्रागतिक विचारसरणीचे स्वागत करणे हे परमपूज्य पैगंबरांच्या शिकवणीचे सार आहे, याची जगांतील साच्या मुसलमानांना आठवण करून दिली आहे. x राष्ट्रांत आपल्याविषयी व आपला राजवटीविषय अज्ञानपणामुळे असंतोष घुमसत राहू नये म्हणून कमालपाशांनी सर्व राष्ट्रभर दौरा काढला. ठिकठिकाणी लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्या गैरसमज दूर करून टाकला. आणखी काही तक्रारी असल्यास, त्या मांडण्यास जनतेला संधी मिळाली म्हणून कमालपाशांनीं असेंब्लीत एक विरोधी पक्ष तयार करण्यास आज्ञा दिली. त्याकारतां लंडन येथे कामगिरीवर असणा-या फतेही नांवाच्या तुर्की अधिकान्यास कमालपाशानी परत अंगोरास बोलावून घेतले. फतेही यांनी इनडिपेंडंट रिपब्लीकन पार्टी नांवाचा सरकारविरोधी पक्ष तयार केला. कमालपाशांच्या या नव्या योजनेस कांहीं पुढा-यानी विरोध केला. हल्लीचे सरकार x Bombay Chronicle, 12 Nov. 1938. ૨૪૨