पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इराकी जनतेचा पोषाक

असतात. नदीची मौज दोन प्रकारची आहे. एक तिची खोली आणि दुसरी म्हणजे समुद्रापासून सत्तर मैल आंत असतांही या नदीस समुद्राला येते तशी भरतीओटी रोज ठराविक वेळीं येत असते! पण नदीचें पाणी गोडेंच आहे. नदीत शार्क नांवाचे मोठमोठे मासे असल्याने आंत कोणत्याही कारणाने पडतां येत नाही. शिवाय मोठ्या कालव्यांत देखील अत्यंत गलिच्छ पाणी असतें आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरतें.  जनरीत, आरोग्य आणि स्वच्छताः- बसऱ्यांत कोठेही गटारें नाहीत! ड्रेनेजचें काम अद्यापि सुरू झालें नसून त्याच्या अभावी वातारण अस्वच्छ असते. हा इकडील प्रांतांचा पावसाळा ! मधूनमधून पाऊस पडला म्हणजे सर्व शहरांत चिखल होतो आणि मग घाणीचा सुकाळ माजतो. अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ आणि अमंगळ लोक. त्यांत इकडील थंडीचें निमित्त मिळाले की, सहा सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही, इतकेंच नव्हे तर एकदा आंगांत घातलेला कपडा बदलण्याससुद्धा रिकामपणापुढे फुरसत मिळत नसावी असें दिसतें. त्यांच्या निर्लज्जपणाने प्रथमतः किळस येते. पण आपला कांही इलाज चालत नसल्याने आपणही अशा कोडगेपणास रुळत जातों.

 इराकी प्रजेंत अरब, यहुदी (ज्यू) व ख्रिस्ती या तीन निरनिराळ्या लोकांचा भरणा आहे. हे तिन्ही वर्ग गौरवर्णीय आहेत आणि विशेषतः ज्यू किंवा ख्रिस्ती साहेबी पोषाकांत असले म्हणजे अगदीं विलायती दिसतात ! अफगाणिस्तानांत युरोपियन वेष सक्तीने लादण्यांत आला असतांही लोकांनी तो मानला नाही. पण इराकमध्ये कोणीही जबरदस्ती केली नसली तरी प्रजाजनांनी आपण होऊन त्या परकीय परिधानाचा स्वीकार केला आहे. अलीकडे मात्र, इराकी टोपी वेगळ्या पद्धतीची आहे ती वापरली जाते. नेपोलियन बोनापार्टची एक विशिष्ट टोपी

५१