पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 पोषाकाचा नवा कायदा---यात्रेकरूंना गाठण्यासाठी आगगाडीच्या स्टेशनवर पंडे लोक मोठ्या आतुरतेनें आणि उत्सुक दृष्टीने येतात; तशांपैकीच कांहीसा प्रकार बोटी बंदरांत येतांना होतो. मात्र पंडे पुष्कळ असतात आणि बोटींवर येणारे हे लोक अगदी शेलके असतात. इराण सरकारचा या बाबतीत विशेष कटाक्ष आहे असे दिसले. डॉक्टर, कस्टम व पोलिस अधिकारी आगबोट बंदरांत नांगर टाकण्यापूर्वीच येतात आणि बोटीवरील सर्व उतारूंची व मालाची बारकाईने पहाणी करून परत जातात. बुशायर हे पहिलेच इराणी बंदर. तेव्हां ही निरीक्षणक्रिया विशेष चिकित्सक दृष्टीने झाली. इराणांतील पोषाकासंबंधीच्या नव्या कायद्याची चुणूक या अधिकाऱ्यांच्या वेषावरून समजली. वेष यूरोपियन पद्धतीचा असून टोप्या ' पेहलवी ' होत्या. म्हणजे गोल टोप्या नेहमीसारख्या असून पुढच्या भागास गार्डाच्या टोपीसारखी पुढे आलेली दोन बोटे रुंदीची पट्टी होती. मानेच्या भागावर इराणचे निशाण काढलेले असे. इराणी झेंडा व हिंदी राष्ट्रीय सभेचा ध्वज यांत फारच थोडा फरक आहे असें दिसलें. वस्तुतः इराणी आखातांत आपण आहोंत ही पूर्वकल्पना मनांत नसती तर काँग्रेसच्या निशाणाकडे आपलेपणाने व आदरबुद्धीने दृष्टि जाते तशीच इराणच्या ध्वजाकडे गेली असती.

 लाल, पांढरा व हिरवा असे तीन रंगी पट्टे मिळून हे निशाण होतें. याच्या मध्यभागीं पिंवळसर रंगांत खड्गधर उग्र 'केसरी' असून त्याच्या पाठीवर उदय पावणारा सूर्य व त्या सहस्रकर भानूवर मुकट ठेवलेला. असे हे इराणचे राष्ट्रीय निशाण आज इराणाच्या आखातांत फार महत्त्वाचे आहे. अगोदर सिंहराजच भीतिदायक, त्यास समशेरीची आणि चंडप्रतापी सूर्यनारायणाची जोड मिळालेली. शिवाय राजाशिरोभूषणाचें सहाय्य, असा हा संयोग वास्तविक भीतिदायक नसला तरी आजच्या राजकारणांत त्याला

३६