पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुक्काम दुसरा : बसरा

( ६ )

 काबूलचा मार्ग तर खुंटला. तेव्हा पाश्चिमात्य सुधारणेचा नवा प्रयोग नुकताच सुरू झाला आहे. त्या इराणांत जावे या हेतूने पेशावरहून कराचीस आलो. ब्रिटिश प्रजाजन म्हणून ब्रिटिश साम्राज्यांत कोठेही जाण्याचा परवाना होता, तरी इराकमध्ये जाण्यास विशेष अडचण असल्याचे समजले. कराचीहून तेहरान थेट गाठणे फारच अडचणीचे व गैरसोयीचें होतें, म्हणून इराकमधील बसरा व बगदाद हीं प्राचीन संस्कृतीची गावें पाहून तेथून पुढे जाणे हाच राजमार्ग पत्करावा लागला. लढाईच्या वेळीं मेसापोटेमिया म्हणून ज्याला म्हणत तोच प्रदेश हल्ली इराक म्हणून ओळखला जातो. इराकचे राज्य हेंव आमच्या 'माबाप' सरकारच्या साम्राज्यापैकी संरक्षित भागांत मोडते; पण त्या राज्यांत प्रवाशांना मुक्तद्वार मुळीच नाही. उलट कोणीही प्रवासी असला तर त्याला अनेक अडचणी उपस्थित करून त्याचा प्रवेश होणे मुष्कील केलें जातें. असें म्हणण्याचें कारण इतकेंच की, कांही लंगड्या सबबींवर प्रवेशास परवानगी मिळत नाही. अगोदर बगदाद येथील गुप्त पोलिस अधिकाऱ्यांची अनुज्ञा मिळाल्याविना कोणासच इराकमध्ये पाऊल टाकता येत नाही. या अडथळ्यामुळे पासपोर्ट मिळविण्यासाठी सव्यापसव्याची भानगड थोडीशी करावी लागली.
 सिंधप्रांताच्या कमिशनरकडेच इराकचे पासपोर्ट देण्याचें काम आहे. त्यांनी प्रथम सांगितले की, वर्तमानपत्रांच्या बातमीदारांसाठी इराक सरकारचे विशेष निर्बंध आहेत आणि त्यांची पूर्वसंमति असल्याशिवाय आम्हाला कोणासच तिकडे जाऊं देतां येत नाही. आम्ही पोस्टाने पत्र

 मु. ३

३३