पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/180

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 मुसलमानी धर्माच्या कट्टया अनुयायांच्या नगरींत-शहाच्या शेलक्या पदार्थसंग्रहालयांत कालियामर्दन करणारा बाल श्रीकृष्ण, गणपति, सरस्वती इत्यादि हिंदु देवतांच्या मूर्ति दृष्टीस पडल्या तर आश्चर्य का वाटूं नये? मुंबईच्या पारशी समाजाने रेझाशहास मानपत्रें व अभ्यर्थनापत्रें पाठविलीं व त्यांना करंडक म्हणून चांदीच्या पेट्या घेतल्या. त्यांवर वरील मूर्ति कोरलेल्या होत्या. "आम्ही मूळचे इराणचे प्रजाजन. आम्हांस या जन्मभूमीस येऊं द्यावें व विशेष सवलती मिळाव्या," या आशयाच्या मागण्या मुंबईच्या पारशी समाजाने केल्या असल्याचें आंतील कागद वाचून कळलें.
 राजवाड्यांतील आणखीही इतर दालनें पाहिलीं. पूर्वीचे शहा कोठे रहात, त्यांचा बसण्याचा दिवाणखाना कोणता, बुरख्यांत रहाणाऱ्या राणीसाहेबांचा महाल कोठे असे, इत्यादि सर्व गोष्टी पाहून झाल्यानंतर जुने पदार्थसंग्रहालय पहाण्यासाठी तळघरांत शिरलों.
 येथे इराणांतील मूळचे तख्त दिसले. 'तख्त-इ-मर्मर' हे 'संगमरवरी' दगडाचें केलें असून तें आठ स्त्रियांच्या खांद्यांवर टेकल्याचें मूर्ति कोरून दाखविले आहे. सहा फूट लांब व चार फूट रुंद अशी एकच 'फळी' दगडाची असून साधारणपणे तीन फूट उंचीच्या दासीही त्याच दगडांत कोरल्या आहेत. मात्र हल्ली त्यांपैकी कांही दासीं छिन्नभिन्न झाल्यामुळे ते तख्त निकामी ठरविलें


 + फारसी भाषेतील खरा अर्थ कळला म्हणजे 'संगमरवरी दगड' हा शब्दप्रयोग अत्यंत कर्णकटु व विचित्र वाटतो. कारण 'संग' म्हणजेच दगड आणि 'मर्मर' ही त्याची विशिष्ट जात. अर्थात् आपण ज्याला 'संगमरवरी दगड' म्हणूं, तोच अर्थ 'संग मर्मर' या शब्दाने दर्शविला जातो. त्याच्या पुढे आणखी 'दगड' जोडणे म्हणजे 'गाईचें गोमूत्र' अशांतलाच प्रकार होय!

१७४