पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/133

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्वांचा मिळून 'एकच प्याला'

हें खरे. त्यांना इतकेच दर्शवावयाचे आहे की, ज्ञातीच्या ज्ञाती एका ताटांत जेवण्याची पद्धत मुसलमानांची असून त्यांच्यांतही भेदाभेद तीव्र आहेच. इराणांत पाऊल ठेवल्यापासून आजपर्यंत मी एका मोठ्या प्रश्नाचा विचार करीत आहें की, फार्सी भाषेत उष्टें, खरकटें आणि किळस या तीन शब्दांना प्रतिशब्द आहेत किंवा नाहीत? एक महिन्यापेक्षा अधिक दिवस इराणांत राहूनही उष्टें, खरकटें किंवा किळस यांपैकी एकाही शब्दाचा उपयोग केल्याचे ऐकले नाही. उपयोग करावा लागेल असले प्रसंग मात्र क्षणोक्षणीं येत. हिंदुस्थानांतील कित्येक भागांत आपल्या भांड्यात दुसऱ्याने नुसता हात लावला एवढ्याच दोषासाठी तें भांडे चांगलें घासावें लागतें. स्वच्छतेचें तें एक टोक मानलें, तर इराणांत दुसरें टोक आहे असें म्हणावेॆ लागेल. युरोपियन देखरेखीखालचीं अगदी थोडी आहारगृहें [रेस्टोरॉं] सोडली तर माणसागणिक पाणी पिण्याचा पेला देण्याची चाल कोठेच नाही. दहाबारा माणसें असलीं तरीही 'एकच प्याला' पुरतो आणि एकाचें पाणी पिऊन झाल्यानंतर तो तसाच पुढे करावयाचा. पहिलें पाणी ओतून टाकणें किंवा विसळणें ह्या क्रिया कधीही व्हावयाच्या नाहीत. पाण्याचे उदाहरण म्हणून सांगितले. मदिरा तर पावकाचीच भगिनी! ती सर्वांनाच पुनीत करते, मग पेल्याचें काय?

  खरकट्याचा प्रश्न अगदी सोडूनच द्या. उत्तर हिंदुस्थानांतही खरकटे कित्येक प्रांतांत मानलें जात नाही. पण किळस मात्र येतो तो इकडील लोकांच्या रिवाजाचा. समजा, दूध घेण्यासाठी तुम्ही गेलां आणि दुकानदारापुढे दुधाचें भांडें भरलेलें आहे, तेथे ज्या मापाने दूध तुम्हांस मोजून मिळणार तेंच माप तोंडाला लावून तो जर पीत असेल तर लगेच तसेंच्या तसेंच तें भांड्यांत घालून तुमचें काम

१२७