ह्यांच्या एका मीटिंगमध्ये. त्यांनी पण ही खटपट केली की हमीद हे प्रश्न घेऊन तू पुढे जा. तेव्हापासून त्यांची ओळख होती. तर शहासाहेबांच्याकडे गेले. नि त्यांना सांगितलं की त्यांच्या ड्रॉवरमध्ये मला असे पैसे मिळालेले आहेत. आमच्या घरात तर दारिद्य असतं, नेहमी पैशाची गरज लागते. चुकून मी ते पैसे घेतले, खर्च केले नि मला देता नाही आले तर घरात उगाच भांडणं नकोत. तर त्यांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा की हे पैसे घरामध्ये ठेवायचे नाहीत. ते पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि हिशोब करा. आणि त्यांना तुम्ही जाब विचारा हं. असं सोडू नका. असं बोलून मी घरी आले. शहासाहेब हसले मला. पण ह्यांना म्हणाले, 'नको ठेवू. तुझ्या बायकोला बरोबर नाही वाटत. मग हा वाद नको.' त्यानंतर आमच्या घरात पैसे आणून ठेवलेले नाहीत. शहांकडे सगळ्याचा हिशोब असायचा. त्यांना माहिती असायचं, पैसे कुठून आलेत, किती आले. सगळा हिशोब शहासाहेबांना माहिती असायचा.
एकदा इंडियन सेक्युलर सोसायटीची मीटिंग होती. दलवाईंना काही दुसरं महत्त्वाचं काम असल्यामुळे ते त्या मीटिंगला जाऊ शकत नव्हते. त्यांनी मला सांगितलं, आज तू जा. तिथं माझ्या ओळखीचे ए.ए.सॉलोमन, सी.आर.दळवी, मे.पुं. रेगे, इनामदार, सिन्हा असे खूप लोक होते. दलवाईंनी सांगितल्याप्रमाणे मी तिथे गेले.दुपार झाली, लंचची वेळ झाली. त्या सोसायटीची स्टेनो गोवानीज् होती. सारखी म्हणत होती, 'जेवायला आज दलवाई नाहीत. मी त्यांच्यासाठी डुकराचं मटण आणलं होतं. त्यांनी खावं अशी माझी इच्छा होती. पण आज ते आलेच नाहीत.' शहासाहेब म्हणाले, 'दलवाई नसले तरी काय झालं? त्यांची बायको तर आहे? काय झालं? तिला दे.'आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी कधी ते खाल्लं नव्हतं.तिला म्हटलं, 'वाढ मला. मला आवडलं तर मी खाईन.' मला ते खूपच आवडलं. मी ते खाल्लं.सगळे खूष झाले.शहासाहेब म्हणाले, 'ती हमीदची बायको आहे.'
घरातले सगळे फोन मी अटेंड करायची. एखाद्या ओळखीच्या माणसाचा फोन आला आणि तो फोनवर माझ्याशी न बोलता, 'हमीदभाईला फोन द्या.' असं म्हणाला आणि त्याने दलवाईंना जर आपल्या घरी गप्पा मारायला आणि जेवायला बोलावलं तर ते माझ्याकडे बघायचे आणि त्यांना सांगायचे, 'थांबा हं, मी मेहरूला विचारतो.' मग मी रागात म्हणायची की मला ओळखत असून ते माझ्याशी का
मी भरून पावले आहे : ८१