पान:मी भरून पावले आहे.pdf/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चलता. काय को डालने का आपा?” हजार सबबी. अरे बाबा, सबको दिमाग नही रहता. एक फर्स्टक्लास रहता और बाकी सारे थर्डक्लास रहते. लेकिन डालो. उनको जबरदस्ती करो. उनको सिखाओ. असं म्हटलं तर मुलांना जाऊ दे, मुलीला कशाला? सातवीपर्यंत मुलगी शिकली, बस झालं. तिला कशाला शिकवायचं. लग्न करून द्यायचं. एक लडका देखेंगे और उसने छोड दिया तो उसे संभालते बैठेंगे. नही तो आपा के पास जाएंगे केस लढाव करके. हे सुद्धा व्हायचं. हसायचे, मी जे बोलायची ना, ते सगळं पटायचं त्यांना. 'आपा बहुत अच्छी बात करती. आपा को सब समझता है हमारा. इसलिए हमारे पास आती है ना, उसका क्या स्वार्थ है?' म्हणजे अशा रीतीने त्या बायका मला बघायला लागल्या. हा एक प्रयोग केला. आत्तापर्यंत त्यांच्याकडे त्या मशिनी पडलेल्या आहेत. काहींनी आपल्यासाठीच वापर करून घेतला. शिकवायचं नाही. आपणच शिवणकाम करायचं नि आपण कमवून खायचं. दुसरं म्हणजे, आम्ही काय करायला लागलो. कॉप्या जमा करायला लागलो. कुणाला तरी सांगायचं की आम्हांला १००-२०० कॉपीज द्या. कॉपीबुक वह्या जमा करायच्या. पुस्तकं जमा करायची. आमचा मुसा, इकबाल, इस्माईल, शहाजहाँ काय करायचे, प्रत्येक मुलाकडे जायचे. तिसरीची पुस्तकं, चौथीची पुस्तकं, सेकंडहँड पुस्तकं अशी सगळी आम्ही जमा करत होतो. असा वर्षातून एक कार्यक्रम आम्ही घ्यायचो. सगळ्या मुलांना जमा करायचं आणि त्यांना ती वह्या पुस्तकं वाटायची. पेन्सिली, कोऱ्या वह्या. वह्या नाहीत, पुस्तकं नाहीत म्हणून शाळेत जात नाहीत असं व्हायला नको म्हणून ३-४ वर्षं हे सगळं केलं. आम्हांला खूप त्रास व्हायचा. पण करत होतो. ३-४ वर्षं दिली नि मग म्हटलं की हे लोक स्वतःहून येऊन आपल्याकडे मागत नाहीत. आपण या वर्षी वह्या-पुस्तके वाटायचीच नाहीत. हो, विचारू दे की आपा, तुम्ही दर वर्षी हे देत होतात. या वर्षी का देत नाही, आम्हांला पाहिजे होतं आणि आम्हांला पुढे शिकता येत नाही असं म्हणत जरी आले असते तर जेवढे आले तेवढ्यांना तरी आपली स्वतःची मदत करून कोणाकडेही न मागता दिले असते. पण तसंही झालं नाही. म्हणजे आता तुम्ही कशा रीतीने यांच्यासाठी काम करायचं? हे काय मुद्दाम करतात असं नाही. पण मुलींकडे जास्त जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं घरची माणसं देत नाहीत, असा अर्थ आहे.

 आता बाईवर अन्याय होतो, बाईवर का, तर हिंदूंची परंपरा १५० वर्षांची आहे. महात्मा फुल्यांपासून. त्या मानानं या १५० वर्षांत हिंदू महिला इतक्या पुढं

१९८ : मी भरून पावले आहे