Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हॉस्पिटल कसं रिलीव्ह करेल तुम्हांला? मग त्यांनी विचारलं. म्हटलं, नाही बाबा कुठेही नेण्याचा प्रश्न नाहीये. लिहून ठेवलेल्याची तोपर्यंत कल्पनाच नव्हती डॉक्टरांना कसलीच. हा माणूस, पेशंट पवारांचा. माझी आर्ग्युमेंट अशी होती की मी जर उपचार केला असता या माणसाचा तर माझ्या परिस्थितीनुसार या माणसाला मी पंधरा दिवस सुद्धा जगवू शकले नसते. औषधाला पैसे नव्हते. माझी ताकद कमी पडली असती. ज्या लोकांनी जिवंत ठेवलं त्या लोकांचा या मयतीवर अधिकार जास्त आहे. तर ही मयत पवारांच्याच घरी जाईल. आणि पवारांनाच ठरवू दे काय करायचं ते. त्याचा अधिकार कुठल्याही नातेवाईकाला नाही. आईला नाही, वडिलांना नाही, बायकोलासुद्धा नाही. असा निर्णय माझा असल्यामुळे ही मयत मला त्यांच्या स्वाधीन करायची आहे. ते नाहीत तोपर्यंत मला पहारा करायचा आहे. असा माझा विचार होता आणि तो सुद्धा या लोकांना आवडला नाही. पण थांबावं लागलं त्यांना. एक वाजला – मी डॉक्टरांना सांगितलं, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तुम्ही मयत तयार करा. तिथं आंघोळबिंघोळ न्हाणंबिणं सगळं करायचं नाही. अजिबात करायचं नाही. कारण पेशंटमध्ये काही राहिलेलंच नाही. सतरा रोगांचा तो पेशंट आहे. कशाला ती इन्फेक्शन्सची भीती? आणि ते करायची गरज काय आहे? तुम्ही आम्हांला मयत तयार करून द्या आता. नुसतं तिथून उचलून नेता येईल अशी.

 आणि मग पवार आले म्हणून कळलं. मग आम्हांला घरी नेलं. घरी हॉलमध्ये त्यांच्या. सगळा हॉल त्यांचा रिकामा केला होता. आणि तिथं हजारो लोक जमा झाले. इतका मोठा हॉल होता त्यांचा. आतून-बाहेरून बायका-बियका सगळे जमा झाले तिकडे. गाववाले सगळे आणि ज्यांना माहिती होतं ते. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे ज्यांना कळू शकलं नाही ते आलेले नव्हते. मी आतल्या खोलीमध्ये मुलींना घेऊन बसले होते. हे झाल्यानंतर ते विलचं प्रकरण झालं. शहासाहेब आले. नगरकर आले. शहासाहेबांनी विल वाचून दाखवलं. ते म्हणाले, हमीदनं विल लिहिलेलं आहे. आता ते आम्हांला वाचायचं आहे. त्यावर गोंधळ खूप झाला. विलबिल काही नाही. त्याच्याकडे प्रॉपर्टी नाही. त्याला अधिकार नाही. अमुक-तमुक. असा स्टंट करणारे लोक होते तिथं. त्या वेळी पवार बोलले. आम्हांला हमीदने विल दिलेलं आहे ते आम्ही वाचणार. काय लिहिलेलं आहे बघा. आणि त्यांनी ते विल वाचून दाखवलं. पहिलं विल – का माझा कुठलाही विधी करायचा नाही. मला मुसलमान पद्धत नको, हिंदू पद्धतीनंही दहन नको. मला चंदनवाडीतच नेण्यात

१५४ : मी भरून पावले आहे