पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भिषग्वर.

 इंग्रजी व आयुर्वेदिक वैद्यशास्त्राच्या आधारानें अलीकडचे नवीन शोध व उपाय देऊन विस्तारपूर्वक लिहिलेलें असें मराठींत अद्याप एकहि पुस्तक झालेले नाहीं. कांहीं लहानसहान पुस्तकें आहेत, त्यांतील माहिती जुनी असून विस्तारपूर्वक नाहीं, त्यामुळे निव्वळ मराठी जाणणाऱ्या वैद्यांची व कुटुंबवत्सल लोकांची मोठीच अडचण होते. ही गोष्ट लक्ष्यांत आणून ' भिषग्वर' नांवाचें पुस्तक आह्मी तयार करीत आहों. हा ग्रंथ मोठा होणार असल्यानें तो पांच भागांनी प्रसिद्ध करावा, असें योजिलें आहे. प्रत्येक भागाची किंमत १ रु. ठेवण्यांत येईल. पुरेसे ग्राहक जमतांच पुस्तकें, छापण्याचें करूं. तूर्त आपणांकडून व आपल्या- मार्फत किती वर्गणीदार होण्याबद्दल आश्वासन मिळेल, तें खालील पत्त्यावर कळविण्याची कृपा करावी.

डॉ. काळोखे,

                                   चर्नीरोड, गिरगांव - मुंबई.