पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

पान खाल्ल्याशिवाय त्यांनां शौचाला होतच नाहीं. अशा प्रकारच्या सवयी लावून घेणें हें शरीराला अत्यंत घातुक होय. यांपासून पहिल्या पहिल्यानें जरी शौचशुद्धि झालीसें वाटलें, तरी मागाहून ती कुचकामी ठरतात. शिवाय, अशा पदार्थांपासून दांत, घसा वगैरे अन्नमार्गातील लहानमोठे अवयव, आणि मज्जातंतू यांत विवाड होऊन शरीरप्रकृति बिघडते ती निराळीच. असो, मलमूत्रोत्सर्गानंतर तीं तीं इंद्रिये पाण्यानें स्वच्छ धुवावीत.

३. तोंड धुणे.

 मलोत्सर्गानंतर तोंड धुवावें. तोंड धुणे तें केवळ घाईघाईनें पाण्याच्या कशाबशा चुळा भरून एकदाचें मोकळे होणें एवढेच नसून, प्रत्येक दांत, जीभ, ओंठ, डोळे, कान, नाक वगैरे तोंडाचे अंतर्बाह्य भाग सात्र- काशपणे अगदीं घांसून स्वच्छ केलेले असावेत. निजून उठल्यावर जिभेवर आणि दांतांवर मलाचा एक प्रकारचा पिंवळा थर बसलेला असतो. झोपेत तोंडाच्या बाहेर थुंकी वाहल्यानें ओंठांच्या बाजूंना आणि कडांनां तिचे डाग सुकलेले असतात. नाक, डोळे वगैरे ठिकाणांतून मलांचें उत्सर्जन झालेलं असतें; म्हणून तोंड वेळच्यावेळी धुऊन जर स्वच्छ केले नाही तर त्यांत रोगजंतु उत्पन्न होतात. अर्थात् हे जंतू अन्नाबरोबर पोटांत जाऊन अन्नमार्ग बिघडूं लागतो, व श्वासाबरोबर जाऊन फुफ्फुसे बिघडतात. शिवाय, दांतांच्या फटींत आणि दांतांवर असलेल्या लहानलहान खोलग्यांत अन्नाचे कण कुजून त्यांत उत्पन्न झालेले रोगजंतू दांतांवरील पांढरें कवच नाहींसें करून टाकितात, त्यामुळे दांत किडून त्यांनां भोंकें पडतात. अशा रीतीनें दांत निःशक्त झाले व त्यांनां भोंकें पडली, म्हणजे एकादा पदार्थ खाल्ला