पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

व आयुर्वेदिक वैद्यशास्त्राच्या दृष्टीनें पहातां पहांटे उठणें, हा नियम आरोग्यदायक आहे. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy & wise, या ह्मणीचें तत्त्व तरी हेंच होय.

२. मलोत्सर्ग.

 निजून उठल्यावर प्रत्येकानें सकाळीं शौचाला जाऊन येणें हें आरोग्याचें एक मुख्य लक्षण होय. सकाळीं शौचशुद्धि केल्यानें पोटां- तील जाड्यता, फुगोशी, गुडगुडाट, अस्वस्थता वगैरे विकार नाहींसे होऊन पोट साफ होतें, क्षुधा लागते व मन प्रसन्न होतें. इतर का करण्याला सुस्तपणा किंवा आळस न वाटतां हुषारी वाटते, दृष्टि चांगली रहाते, आणि आंतड्यांत मळ कुजल्यानें त्यापासून उत्पन्न होणारीं विपें रक्तांत शोपिलीं जाऊन मस्तकशूल, घेरी, निरुत्साह वगैरे मनाच्या अस्वस्थतेचे जे विकार होतात, ते होत नाहींत- अर्थात् आरोग्य प्राप्त होतें. ह्मणून प्रत्येकानें हयगय न करितां हा नियम पाळणे अगदीं जरूरीचें आहे. अशा रीतीनें मलोत्सर्गासंबंधानें काळजी न घेत- ल्यास केवळ वरील विकार होऊनच रहातात असे नसून शिवाय आंतड्यांत कुजलेल्या मलापासून उत्पन्न झालेला दुर्गंधयुक्त वायु बाहेर हरघडी निघत राहून चारचौघांत फजिती होते.  ज्या वेळी आपण नियमानें शौचाला जात असतांहि जर शौच- शुद्धि होईनाशी झाली तर उगाच फार वेळ तेथें कुंथत बसणे बरें नाहीं. कारण, यामुळे शौचाला तर होत नाहींच; पण उलट कुंथत बस- ण्याच्या सवयीनें गुदकांडावर दाब पडून मूळव्याध, गुदभ्रंश वगैरे- सारखे भयंकर रोग मात्र जडतात. वाग्भटकार ह्मणतात “रोगा: सर्वेपि जायंते वेगोदीरणधारणैः " अर्थः - बळेच वेगप्रवृत्ति केल्याने किंवा
-