पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
मी निरोगी कसा राहीन ?


मिथ्या योगांचीं उदाहरणें येणेंप्रमाणें:-मुळींच उजेडांत न जाण्यानें डोळ्यांचा कमी उपयोग केल्यासारखा होतो. सर्वदा उन्हांत फिरल्यानें दृष्टीचा अतियोग घडतो. बीभत्स पदार्थ पाहणें हा दृष्टीचा मिथ्यायोग करणें होय. बिलकुल व्यायाम न करितां पडून रहाणें ह्मणजे कर्मेंद्रि- यांचा कमी उपयोग करणे होय. अतिव्यायाम केल्यानें त्यांचा अति- योग केल्यासारखा होतो. वेड्यावांकड्या उड्या मारणे किंवा दांतांनीं एकादें ओझें उचलणें हा त्यांचा मिथ्यायोग होय. तात्पर्य, सर्व गोष्टींत मितपणा असला ह्मणजे आरोग्य प्राप्त होतें.

 प्राणरक्षणास व शरीरप्रकृति निरोगी राहण्यास ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यांची माहिती नित्यवर्तनक्रमांत गोंवून अनुक्रमानें दिली आहे, ती अशी:-

१- पहांटे उठणें.

८- अन्न.

२-मलोत्सर्ग

.

९ - ज्ञानेंद्रियें.

३- तोंड धुणे.

१०- स्वच्छता.

४-हजामत करणे

.

११-झोंप.

५-व्यायाम.

१२ रहातें घर.

६-अभ्यंग.

१३- मितपणा

७-स्नान.

१४- सदाचरण.

१५ – नित्यवर्तनक्रम.
१. पहांटे उठणे.

 हा नियम फार थोडे लोक खेरीजकरून बहुतेकांनां साधण्यासारखा आहे. नेहमीं पहांटे उठण्याची सवय ठेविल्यानें तीपासून केवळ आरोग्यच प्राप्त होतें असें नसून इतर दुसऱ्या गोष्टीहि व्यवस्थितपणें करण्यास ठीक पडतें. उठल्यावर पहिल्यानें ईश्वराचें स्मरण करून मग दुसऱ्या कामांला