पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

लागली ह्मणजे त्या ठिकाणीं कांहीं तरी रोग आहे हें सिद्ध होतें. निरोगीपणा ही नैसर्गिक स्थिति असून रोग असणें ही अस्वाभाविक स्थिति होय. मनुष्य जोपर्यंत आहारविहार वगैरे बाबतींत योग्य रीतीनें संभाळून असतो, तोपर्यंत त्याला रोग होण्याची फारशी भीति नसते, पण त्यांत चुकी झाल्यास त्याला रोगाच्या तडाक्यांत यावें लागतें. तात्पर्य रोग हा कारणावांचून नसतो. रोग होण्याची सर्वच कारणे आपल्या हातचीं नसतात. कांहीं दैवकृत असतात. उदाहरणार्थ; उष्णता, थंडी, हवा वगैरेंत फेरफार होणें, वीज पडणें, धरणीकंप होणे किंवा अशा प्रकारची दुसरी कारणें हीं दूर करणें आपल्या हातचें नसतें.

 आर्यवैद्यकांत रोग होण्याची मुख्य कारणे थोडक्यांत दिली आहेत, तीं अशीं:- -

कालार्थकर्मणां योगा हीनमिथ्याऽतिमात्रकाः । सम्यग्योगश्च विज्ञेयो रोगारोग्यैककारणम् ॥

-  अर्थः – शीतोष्णादिकाल, शब्दस्पर्शादि विषय (अर्थ) व कायिक, वाचिक व मानसिक कर्मे यांचा वाजवीपेक्षां कमी किंवा जास्त अथवा वाईट उपयोग करणे, हेंच रोगमात्रांचें मुख्य कारण होय; व त्यांचा यथार्थ उपयोग हेंच आरोग्याचें मुख्य बीज आहे.

 याचा अर्थ विशेष स्पष्ट करून सांगावयाचा तो असा, कीं, शीता- दिकालांचा वाजवीपेक्षा कमी उपयोग ह्मणजे पावसाळ्यांत जितका पाऊस असावा तितका नसणे, हिवाळ्यांत जितकी थंडी असावी तितकी नसणें व उन्हाळ्यांत उष्णता कमी असणे. याच्या उलट स्थिति झाली ह्मणजे शीतादिकालांचा अधिक उपयोग किंवा अति- योग घडला असे समजावें. मिथ्यायोग किंवा वाईट उपयोग कालाचें केवळ वैपरित्यच होय. विषय व कर्मे यांच्या न्यूनाधिक व