पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२

 याप्रमाणे दोन गांवाची सनद वंशपरंपरेनें असून "पदांती पहा सहश्री " ( हजार पायदळांचे सरदार ) नेमले.

 याच घराण्यांत बाजी महादेव हा सन १७४९ त बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांच्या हुजुरांत नोकरीत राहून, त्यानेही आपल्या पूर्वजाप्रमाणे बाणेदारपणा दाखविण्यास प्रारंभ केला. त्यावेळी यमाजी शिवदेवानें सांगोला येथें बंड केलें, तैं मोडण्याकरितां सदाशिवरावभाऊ बरोबर बाजी महादेव गेला होता. तेथें त्यानें जें शौर्याचें कृत्य केले, त्यामुळे भाऊसाहेबानें त्यांस २५ स्वरांची शिल्लेदारी दिली. त्यानें सन १७७४ पर्यंत अनेक लढायांत आपला पराक्रम पेशवाईत गाजविला. ह्याच सुमारास नारायणराव पेशव्यांचा वध झाला. नारायणरावांचा वध म्हणजे भटशाहीचा अंत व बारभाई अगर भानूंचा उदय ! ह्यावेळी जो जातीमत्सर उद्भवला त्यांत अनेक शिवकालीन घराण्यांतील सरदार पेशवाईतून निघून गेले, त्यांत बाजी देशपांडे हा गोविंदराव गायक- वाडांकडे गेला. तेथें तो आपल्या पराक्रमानें उदयास आला.

 शिवाजीमहाराजांनी जातिभेदाचें जाचक स्वरूप पुष्कळच कमी केलें, त्यामुळे त्यांस आपल्या छत्राखाली सर्व महाराष्ट्र एकवटतां आला. ही स्थिति पुढे टिकली नाहीं. पेशवाईत मराठ्यांच्या दौलतीचा विचार स्वजातीयापलिकडे विशेष राहिला नाही, आणि लौकिक सहानुभूतीचें अधिष्ठान हळू हळू सुटत चाललें. राज्याची शाती सामान्यजनांच्या जिव्हाळ्यावर अवलंबून असते. परदेशी लोकांची फलटण उभी केल्यानें फौजफाटा वाढला तरी दौलतीचा अभ्युदय होत नाहीं. पेशवाईत मावळ्यांच्या फलटणी नष्ट करून त्यांच्या- ऐवजी गारद्यांची व अरबांची शिबंदी वाढविली. ज्या जातींच्या लोकांना