पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीं घेतला आहे तो दूर करून हल्ली नरसो भिकाजी सभासद सेवक मजमू हुजूर घेतले असेत.

तारीख १२ जमादिडावल.
पत्रावधि
रयं भाति

 याप्रमाणें सनद असून हा जनाजी पुढे श्रीशाहूमहाराजांचे कारकीर्दीत स्वपरराक्रमानें प्रसिद्धीस आलेला आहे.

 याच सुप्रसिद्ध घराण्यातील बापुजी सोनाजी हा नागपूरकर परसोजी भोसला याजकडे जमेनिसीकडे असतांना सन १७०७ त श्रीशाहूमहाराज दिल्लीहून सुटून वन्हऱ्हाडांत लांबकानीचे मुक्कामी आले, त्यावेळी ताराबाई- साहेबानी मोठें राजकारण करून हा खरा शाहू नसून तोतया आहे, असे प्रतिपादन करून शाहूमहाराजांस दक्षिणेत येण्याचा अडथळा केला. त्यावेळी शाहूमहाराजांचा मुक्काम लांबकानी याच ठिकाणी होता. तेथें बापुजी सोनाजी हा येऊन भेटला. त्यावेळी शाहूमहाराजांनीं बापुजीस सांगित- लें कीं, इकडील सरदारांचा व आमचा परिचय नाहीं, जर सर्व मंडळी अनुकूल करून घ्याल, तर स्वामीचें महत्कार्य केल्याचें होईल. त्याप्रमाणें बापुजी परत नागपुरास येऊन त्यानें परसोजी व साबाजी भोसले यांस कळविलें, ताराबा-.