पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिले आहे. त्यांत त्यांच्या घराण्याची अर्वाचीन माहिती उपलब्ध झाली ती व महत्वापुरती वंशावळ शेवटी दिली आहे.

 ऐतिहासिक जुने-लेखचरित्रें स्वतंत्रच प्रसिद्ध करावीं, असें निश्चित ठरवून चिटणीस घराण्याची दोन पुस्तकें प्रसिद्ध केल्यानंतर प्रस्तुत चरित्र सर्वांग सुंदर व्हावें, म्हणून त्या घराण्यांतील अनेक गृहस्थांकडे अनेक वेळां पत्रद्वारें विनंती करून ऐतिहासिक माहिती मागविली; परंतु फक्त दोनच सन्माननीय गृहस्थांकडून माहिती आली - एक श्री. रामराव नारायण प्रधान व दुसरे श्री नारायण रघुनाथ देशपांडे (हल्ली कैलासवासी.) त्यांत श्री देशपांडे यांनी चरित्रनायकाच्या बाळपणाची माहिती व वंशावळ पाठविली होती. त्यामुळे त्यांच्या लहानपणाची माहिती लिहिण्याचा सुयोग आला.

शेवटीं ज्या गृहस्थांनीं आह्मांस चरित्र लिहिण्यासंबंधी माहिती दिली व ज्या ग्रंथांचे आधार घेतले, त्या ग्रंथकर्त्यांचा व माहिती देणारांचा चरित्रलेखक अत्यंत आभारी आहे.

बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.