पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री
प्रस्तावना.
थोर महात्मे होऊनि गेले चरित्र त्यांचें पहा जरा ।
आपण त्यांच्या समान होऊं हाच सांपडे बोध खरा ॥

जीवित महत्म्य.

 अनेक देशांमध्यें जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांचीं कीर्तिरूप चरित्रे सतत आपल्या डोळ्यांपुढे असल्याने त्यांच्यापासून आपलाहि फायदा होणें शक्य आहे. थोर पुरुष जे असतात त्यांची कीर्ति दिगंनीं गाजत असते. तिला आमच्या लेखांनी किंवा शब्दांनी तिळमात्रही भर पडणार नाही, परंतु त्यांची कृति, त्यांचे उद्योग, त्यांची सद्बुद्धी, त्यांची सत्यनिष्ठा, तद्वत् त्यांचें धैर्य, शौर्य, निर्लोभता, स्वराज्यनिष्ठा इत्यादि त्यांच्या अंगच्या गुणांनी, त्यांची चरित्रें अत्यंत बोधप्रद झालेली असतात व असल्या चरित्रांपासून वाचकांच्या विचारांस व आचारांसहि एकप्रकारें उदात्त वळण लागण्याचा संभव असतो. ह्मणूनच ह्या लाभापुढे दुसऱ्या कोणत्याहि लाभाची मात्तबरी नाहीं.

 सांप्रत महाराष्ट्रांत आपल्या पूर्वजांचा इतिहास प्रसिद्ध करण्याचा संघटित प्रयत्न होत आहे. हे सुदैवच समजले पाहिजे, त्याप्रमाणे त्यांच्यांतील थोर पुरुषांची चरित्रेंहि प्रसिद्ध होणें अवश्य आहे. तेणेंकरून आपल्या महाप्रतापि पूर्वजांच्या अनेक गुणांची पारख होऊन त्यांची योग्यता किती होती, हे जाणण्यास आह्मांस सवड मिळेल. तद्वत् त्या काळांत व सांप्रत कोणती उणीव आहे, हे समजण्यास योग्य साधन होऊन आम्ही कोणता मार्ग स्वीकारावा त्याची