पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धर्म, जातींचे वेगवेगळे गट.) समलिंगी पुरुषांचा एक गट, समलिंगी स्त्रियांचा दुसरा गट. वंध्यत्व असलेल्या लोकांचा गट, वेश्यांचा गट, एचआयव्हीसंसर्गित लोकांचा गट इत्यादी. असे असंख्य गट व पोटगट निर्माण झाले आहेत. यातल्या सर्व गटांचं एक वैशिष्ट्य असतं. यांना आपल्यावर होणारा अन्याय स्वच्छ दिसतो. हा अन्याय होऊ नये, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून काहीजण (मोजकीच) जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. पण हे सर्व करताना आपण इतरांवरही विविध प्रकारे अन्याय करतो हे सोयीनं विसरतात. जे स्वातंत्र्य आपल्याला हवंय तेच स्वातंत्र्य दुसऱ्याला देताना मात्र आपण हात आखडता घेतो आणि अशाप्रकारे आपली लैंगिकतेकडे बघायची एक दुटप्पी दृष्टी तयार होण्यास सुरुवात होते- प्रत्येक प्रसंगाला वेगवेगळे मुखवटे वापरणारी, दुसऱ्याच्या अंगवळणी खोटेपणा पाडणारी. याला कारण आहे, की काही स्तरांवर तरी आपण आपली लैंगिकता पूर्णपणे स्वीकारलेली नाही. कुठेतरी आपल्या शरीराबद्दल, लैंगिक इच्छांबद्दल, आपल्या लैंगिक गरजांबद्दल, लैंगिक वर्तनाबद्दल आपल्याला अपराधीपणाची भावना आहे. मनात तिरस्कार आहे, घृणा आहे. जिथे आपलीच लैंगिकता आपण पूर्णपणे स्वीकारलेली नाही तिथे दुसऱ्याची लैंगिकता संवदेशनशीलपणे बघायची, त्या लैंगिकतेचा आदर करायची व स्वीकारायची प्रगल्भता आपल्यात कुठून येणार?

२४२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख