पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असं उदाहरण इतरत्र घडलं असेल). मला जे दिसलं ते असं तारुण्यात काही ट्रान्सजेंडर मुलं, जी कमी शिकलेली आहेत, गरीब आहेत, बायकी आहेत ती आपणहून रित टाकतात. त्यात लैंगिकतेचा भाग असतो व अनेक वेळा आर्थिक गणितही असतं. नायकांची/गुरूंची सत्ता, त्यांचा पैसा, त्यांची भडक जीवनशैलीही भुरळ घालते. त्याचबरोबर आपलाही एक समाज आहे, या समाजाची एक संस्कृती आहे. यात आपण रित टाकली तर आपण यात सामावले जाऊ ही तळमळ असते. रित घेण्यासाठी धमकावणी, जबरदस्ती नसते. एखादी व्यक्ती रीत घेईल असं वाटलं तर मात्र त्या व्यक्तीने आपल्याच नावावर रीत टाकावी म्हणून काही गुरू त्या व्यक्तीवर दबाव आणतात. यांतले काहीजण कालांतरानं खच्चीकरण करण्यासाठी पैसे साठवू लागतात. जबरदस्तीनं खच्चीकरण होण्याचं एकही उदाहरण माझ्या कामात मी पुण्यात पाहिलेलं नाही (अपवादात्मक असं उदाहरण इतरत्र घडलं असेल). कोणी आपणहून स्वखुशीनं हिजड्यात रित टाकतं, खच्चीकरण करतं, हे समजायला लोकांना खूप जड जातं (बघा, सत्र- 'लिंगभाव'). माझ्या संस्थेतील एक उदाहरण 'लाची'. पंजाबी ड्रेस घालणारी, भडक लिपस्टिक लावणारी, मोठ्ठाली कानातली घालणारी, चांगली शिकलेली, स्वतःला स्त्री समजणारी. ट्रान्सजेंडर असल्यामुळे नोकरी मिळत नव्हती म्हणून हिजड्यात रित घेतली. साडी घालून मंगती मागू लागली, बिड्यात नाचू लागली. माझ्या संस्थेच्या एचआयव्ही/एड्स नियंत्रण प्रकल्पात तिनं काही काळ काम केलं. तिच्या घरच्यांना तिची जीवनशैली पसंत नव्हती म्हणून घरच्यांपासून वेगळी झाली. काही काळाने तिने निर्वाणीसाठी पैसे साठवले व निर्वाण झाली. जोगते जोगता/जोगती म्हणजे देवाला वाहिलेला पुरुष/स्त्री. महाराष्ट्रात जोगत्यांची अनेक घराणी आहेत. जोगते हे हिंदू धर्माकडे झुकलेले असतात. हिजड्यांसारखे यांच्यातही नायक, गुरू व चेले असतात. जोगत्यांमध्ये एका व्यक्तीचे एकाच वेळी जास्तीत जास्त सात गुरू असू शकतात. जोगत्यांमध्ये काहीजण भिन्नलिंगी पुरुष/स्त्रिया असतात. काहीजण ट्रान्सजेंडर्स असतात. अनेकजण लग्न करून संसार करतात. काहीजणांच्या घरात देवाची परडी असते तर काहींना लहानपणीच मोती घालून जोगतेपणाचा वारसा चालवला जातो. जोगत्यांमध्ये निर्वाणी करणं निषिद्ध आहे. जोगत्यांच्या गळ्यात पाच मोत्यांची माळ असते ज्याला 'दर्शन' म्हणतात. जोगत्यांची देवी म्हणजे सौंदत्तीची यल्लमा. जोगते देवीची परडी घेऊन पैसे मागतात २३८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख