पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पर्यावरण व प्रजनन आरोग्य . पर्यावरणाचे आपल्या प्रजनन क्षमतेवर, लैंगिक सुखावर होणारे परिणाम यांवर मी जेव्हा वाचू लागलो, तेव्हा लक्षात आलं की या विषयावर फार थोडं काम झालेलं आहे. पर्यावरणाचा आपल्या लैंगिक पैलूंव्यतिरिक्त होणाऱ्या इतर परिणामांबद्दल काही प्रमाणात तरी घास झालेला आढळतो. दूषित पाण्यानं पसरणाऱ्या साथी, वायू प्रदूषण व श्वसनाचे विकार, कीटकनाशकं व इतर रसायनं/खतं यामुळे होणारे शारीरिक आजार अशा त-हेचे अभ्यास काही प्रमाणात झालेले आहेत. पण पर्यावरणाच्या विविध पैलूंचा लैंगिकतेशी असणारा दुवा शोधण्याचा प्रयास करणारे अभ्यास खूप कमी प्रमाणात नजरेस आले. जे लैंगिकतेसंदर्भात संशोधन माझ्या वाचनात आलं त्यात मला असं दिसलंकी-

  • ही सर्वेक्षणं/अभ्यास मुख्यतः स्त्रियांच्या व पुरुषांच्या प्रजनन आरोग्याशी

निगडित आहेत. उदा. गर्भधारणा, प्रसूती, अर्भकाचं वजन इत्यादी.

  • जीवनशैली, आहार, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे जगभरात पुरुषबीजांच्या

निर्मितीत - संख्येत व क्षमतेत घट होताना दिसू लागली आहे.

  • बहुतेक कारखान्यांत पुरुष कामगारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे कारखाने,

भट्ट्या इत्यादी वातावरणात केलेले अनेक अभ्यास हे पुरुषांवर आधारित आहेत. या वातावरणात स्त्रियांवर होणाऱ्या परिणामांची माहिती फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

  • बहुतेक प्रजननाशी निगडित असलेले अभ्यास शारीरिक आरोग्याच्या

आनुषंगाने आहेत. फार थोडे अभ्यास लैंगिकता व मानसिक आरोग्यातील दुवे शोधणारे आहेत.

  • पर्यावरणातील विविध घटक व लैंगिक उत्तेजना/लैंगिक सुख यांच्यातील

दुवे शोधणारी सर्वेक्षणं/अभ्यास नगण्य आहेत.

  • वातावरणातील विविध घटकांचा प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास

करणं तुलनात्मकदृष्ट्या सोपं आहे. त्या घटकांचा माणसांवर सूक्ष्म पण दूरगामी होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं खूप अवघड आहे. म्हणून २१८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख