पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही. कारण ती स्त्री रडायला लागली की त्याचा गाजावाजा होतो. सल्ला दयायला व कीव करायला नातेवाईक सरसावतात आणि याचा तिला जास्तच त्रास होतो." पुरुषालाही मित्र चिडवायला लागतात. पण स्त्रीला जसा समोर त्रास दिला जातो तसा इथे होण्याची शक्यता कमी असते. इथे टोमणे आडून कानावर येतात. पुरुषाला सल्ले दिले जातात पण त्याचा रागरंग बघून, आपण जरा जागा दिली तर लगेच सल्ला देण्यास मित्र पुढे सरसावतील याची कल्पना असल्यामुळे तो या विषयावर कोणापाशी बोलायचं टाळतो. एखादा जवळचा मित्र असेल तरच त्याच्यापाशी बोलणं होतं. अनेक महिने/वर्ष, नवस/उपवास/गंडे-दोरे घालून ध्येय साध्य झालं नाही, की मग शेवटी डॉक्टरांकडे जाणं होतं. डॉक्टरांकडे जाणं हा पहिला टप्पा नसतो. तो शेवटचा पर्याय म्हणून बघितला जातो. डॉक्टरांकडे जायला काही पुरुषांना लाज वाटते. आपण कुठेतरी कमी पडलो आहोत असा अपराधीपणा वाटतो. म्हणून मग अनेकवेळा स्त्रीला एकटीलाच दवाखान्यात जायला सांगितलं जातं. मूल न होण्याची दोघांमध्ये विविध कारणं असू शकतात. म्हणून दोघांचीही तपासणी व्हावी लागते. नुसतं एकानेच तपासणी करून चालत नाही. माहिती घेतल्यानंतर व शारीरिक तपासणीनंतर पहिली चाचणी ही पुरुषाच्या वीर्याची केली जाते (सीमेन अॅनॅलिसीस). पुरुषाला हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना तपासणीसाठी दयावा लागतो. या चाचणीत पुरुषाला काही त्रास होण्याचा प्रश्न नसतो. या चाचणीत वीर्यात पुरुषबीजं आहेत का? त्यांचं किती प्रमाण आहे? त्यांची पुढे सरकायची क्षमता किती आहे? हे बघितलं जातं. पुरुष जर तपासणीसाठी तयार नसेल तर कोडं सुटायला मदत कशी होणार? मूल न होण्याची काही कारणं पुरुष

  • काही कारणानी पुरुषाचं लिंग उत्तेजित होत नसेल तर, लिंग योनीत घालून

संभोग करता येत नाही व म्हणून पुरुषबीजं योनीत पोहोचत नाहीत.

  • काही पुरुषांच्या वृषणात पुरुषबीजं तयार होत नाहीत.
  • काहींमध्ये पुरुषबीजांची निर्मिती खूप कमी प्रमाणात होते.

जर प्रत्येक एमएल(ml) वीर्यात पुरुषबीजांची संख्या २० 'मिलीयन' पेक्षा कमी असेल तर गर्भधारणेस अडचण येऊ शकते.

  • काही पुरुषांच्या बीजांची पुढे सरकायची ताकद कमी असते. जर ६०

टक्क्यापेक्षा कमी पुरुषबीजं व्यवस्थितपणे पुढे सरकत असतील तर गर्भधारणेस अडचण येऊ शकते. २१२ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख