पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वंध्यत्व " , माझ्या कार्यशाळेत वंध्यत्वावर चर्चा सुरू झाली की किमान एक तरी उदाहरण समोर येतंच, जिथे नातेवाइकांनी/मित्रांनी एखादया पुरुषाला सल्ला दिलेला असतो, की “मूल होत नसेल तर तुझ्या बायकोला सोडून दे. दुसरं लग्न कर.” मूल होत नसेल तर त्याला स्त्रीच जबाबदार आहे अशी अनेकांची धारणा आहे. या दृष्टिकोनात बदल होणं गरजेचं आहे. काही जोडप्यांना मूल हवं असतं पण विविध कारणांनी गर्भधारणा होण्यास अडचण येते. काही वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर हळूहळू नात्यात ताण निर्माण होतो. त्यात भर म्हणून, सासू-सासऱ्यांचा त्यांना आजी-आजोबा बनायचं आहे असा दबाव वाढतो. घरचे, शेजारचे 'काय अडचण आहे?' असं विचारू लागतात. 'हा होम करा', 'मंगळवारचे निर्जळी उपवास करा', 'जागृत दैवताला नवस बोला' असे अनावश्यक सल्ले दिले जातात. यात जास्त त्रास स्त्रीला दिला जातो, कारण गर्भधारणा होणं ही स्त्रीचीच जबाबदारी मानली जाते. या सगळ्यामुळे तिच्या मनावरचा ताण वाढतो. चोवीस तास तोच प्रश्न समोर दिसू लागतो. अगदी सहज विषय निघाला तरी त्या ताईंना नकोसं होते. एखादी मैत्रिण स्वतःच्या गर्भारपणाच्या गोष्टी काढते - या आठवड्यात उलट्यांचा त्रास किती आहे, आज चिंचा खाण्याचा मोह आहे इत्यादी. अशा गोष्टी ऐकून भावनाविवश होऊन त्या ताईंना रडू कोसळतं. मैत्रिणींची चीड येते. मैत्रिणींच्या मुलांचे वाढदिवस अंगावर काटा आणतात. मुलं असलेल्या मित्र/मैत्रिणींबद्दल मत्सर वाटायला लागतो. मत्सर वाटतो म्हणून मग त्याचा अपराधीपणाही वाटतो. त्यात भर म्हणून काहीजण आवर्जून, दर वेळी भेटलं की, “काय प्रॉब्लेम आहे?" म्हणून विचारत राहतात. चिडून त्यांच्या मुस्कटात यावी, का तिथून रडत पळून जावं अशा त्या ताईंची मनःस्थिती होते. डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, “मी क्लायंटला सांगतो, असा प्रश्न विचारला की शांतपणे सांगा, की मी या विषयावर बोलू इच्छित नाही'. न चिडता सांगा पण खंबीरपणे सांगा. म्हणजे परत कोणी विचारायचं धाडस करत मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २११