पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणाली, (तिचं डावं स्तन कर्करोगामुळे काढलं आहे)“माझी शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी जवळजवळ साठीला आले होते. त्यामुळे मला एक स्तन जाण्याचा फारसा मानसिक त्रास झाला नाही. हीच जर एखादी तरुण मुलगी असती तर तिला नक्कीच याचा त्रास झाला असता." औषधोपचार चालू असताना गोळ्या- औषधांचा त्रास होतो. औषधांमुळे तोंडाला, घामाला जास्त वास येतो. दिसण्यातही फरक

पडतो.सकाळी वेणी घालताना केसांचे पुंजके खाली पडतात, हे बघून घाबरायला होतं. आपल्या मनाची अवस्था बघून जोडीदार आधार दयायला, मिठीत घ्यायला जरी आला तरी त्याच्यावर वस्दिशी ओरडणं होतं. आधार मिळाला नाही तरी त्रास होतो, मिळाला तरी मूड चांगला नसेल तर आधार घ्यावासा वाटत नाही. हे सर्व जोडीदाराने समजून घेणं महत्त्वाचं असतं. आपला/आपली जोडीदार किती समजूतदार आहे, यावर आपली स्व-प्रतिमा अवलंबून असते. अनघा घोष म्हणाल्या, “या प्रवासात मला माझ्या घरच्यांकडून, नवऱ्याकडून, मुलीकडून इतका मोठा आधार मिळाला की या आजाराला सामोरं जाणं मला एवढं अवघड गेलं नाही."

 काहींना जोडीदाराची साथ मिळत नाही. आपल्यातील वेगळेपण पाहून जोडीदार दूर जातो, तो सहवास टाळायला लागतो. काही जोडप्यांमधला संवादच बंद होतो. जेव्हा जोडीदाराच्या आपुलकीची खूप गरज असते तेव्हा तो दूर गेला की मन खूप दुखावतं. आपलं इतक्या वर्षांचं नात हे फक्त शरीराच्या ठेवणीवर अवलंबून होतं, हा प्रत्यय आला की मन कळवळतं.

 औषधोपचारांनी जसजसं शरीर सुधारायला लागतं तसं परत चांगलं दिसायचा प्रयत्न होतो. टोप बसवणं, कृत्रिम स्तन बसवणं, वेशभूषा बदलणं इत्यादी. लैंगिक जवळीक साधायची इच्छा होऊ लागते. पण काहीजणांना त्याचा अपराधीपणा वाटतो. एवढं गंभीर आजारपण असताना आपल्याला लैंगिक इच्छा होतात, हे चुकीचं वाटतं. संभोग करताना इजा होणार नाही ना याची काळजी असते. उदा. स्तन काढलेलं असेल तर तिथल्या व्रणावर जोडीदाराचा हात लागला तर दुखेल याची दोघांना भीती असते. जर कंबरेच्या भागाला रेडिएशन' दिलं तर त्यामुळे पुरुषांमध्ये लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण येणं, वीर्यपतन न होणं व स्त्रियांमध्ये योनीत कोरडेपणा येऊन संभोग करताना दुखणं असे परिणाम दिसू शकतात. असं असूनसुद्धा आपला लैंगिक अनुभव हे आपल्या अस्तित्वाचं एक महत्त्वाचं प्रतीक

आहे. तो उत्सव इच्छा असेल व शक्य असेल तर साजरा का करू नये? अनेकांसाठी मर्यादा असतील, अडचणी असतील. पण 'प्रशांती कॅन्सर सहायव्हर्स ग्रुप' च्या संचालिका डॉ. रमा शिवराम म्हणाल्या तसं, "Illness does not mean being asexual."

 काही जोडीदारांना भीती असते की कर्करोग असलेल्या जोडीदाराबरोबर संभोग
मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

१५७