पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या प्रणयात उमटतात व आपल्या लैंगिकतेला विविध कंगोरे देतात. जसे हे विविध पैलू आपली लैंगिकता घडवतात; तसेच आपणही आपल्यावर झालेले संस्कार व आपले अनुभव घेऊन आजूबाजूचे लैंगिक वातावरण घडवू लागतो. लैंगिकतेचं चक्र नियंत्रणं नैसर्गिक घडण लैंगिक सूख प्रभाव लैंगिकतेच्या चक्राच्या आकृतीत मी नियंत्रण व प्रभाव असे दोन शब्द वापरले आहेत. हे विभाजन ढोबळपणाने केले आहे याची मला जाणीव आहे. कोणत्या पैलूला प्रभाव म्हणायचे व कोणत्या पैलूला नियंत्रण म्हणायचे हे सांगणे अनेक वेळा अवघड असते. काही पैलू दोन्ही बाजूत मोडतात. हे असलं तरी नियंत्रण हा प्रभावापेक्षा कठोर शब्द आहे. त्याच्याबरोबर लिखित किंवा अलिखित नियमावली आहे. धर्म, संस्कृतीनी ठरवलेल्या लिंगभेदाची निबंधने, कायदयात उतरलेले लैंगिक कृतीबद्दलचे गुन्हे ही नियंत्रणे आहेत. त्याच्या तुलनेत, प्रभाव हा थोडा सौम्य शब्द आहे. इथे नियमावली नसली तरी प्रत्यक्षपणे किंवा अनेक वेळा अप्रत्यक्षपणे विविध पैलू आपल्या लैंगिकतेवर प्रभाव पाडतात. पर्यावरण असो किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण असो, आजार, औषधं असोत किंवा विकलांगता असो, असे असंख्य पैलू आपल्या लैंगिकतेला आकार देत असतात. लैंगिकतेचे काही महत्त्वाचे पैलू नैसर्गिक घडण लैंगिक नियंत्रण लैंगिक अनुभव लैंगिक प्रभाव लिंग धर्म/संस्कृती स्वप्नरंजन लैंगिक समस्या लिंगभाव लिंगभेद संभोग विकलांगता लैंगिक कल लैंगिक शिक्षण संभोगेतर मार्ग आजार/औषधं, दारू/नशा कायदे लैंगिक शोषण, प्रजनन, वेश्या व्यवसाय पर्यावरण, प्रसारमाध्यम हिजडा समाज मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ०३