पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहण्याची संधी दयावी असे काही प्रयत्न झाले, पण त्याला फार यश आलं नाही. कारण काहींना लैंगिक इच्छा झाली की त्या क्षणी ती पुरी करावीशी वाटते. त्यांना वेळ, काळ, जागा, औचित्य याचं भानं नसतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या जोडीदाराची इच्छा आहे की नाही याच्याकडेही ध्यान नसतं. अशामुळे या प्रयत्नांना फार यश आलं नाही." टिप्पणी - आनुवंशिकता व पालकत्व- मतिमंद होण्याची काही कारणं आनुवंशिकतेशी जोडलेली आहेत. उदा. 'डाऊन्स सिंड्रोम'. जिथे ‘फॅमिली हिस्ट्रीत' मतिमंदता असेल तिथे 'जेनेटिक' कॉन्सेलिंगचा आधार घेऊन मूल होऊ दयायचं की नाही हा विचार करावा. आपल्या देशात असं दिसतं, की बहुतांशी वेळा पहिलं मूल होईपर्यंत अशा शक्यतांचा विचार केला जात नाही. - अंध/कर्णबधिर व्यक्ती अंध/कर्णबधिर व्यक्तींमध्ये ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता असते, पण दृष्टी किंवा श्रवण करण्यास अडचण असल्यामुळे संवाद साधण्यास मोठी अडचण येते. वयात आल्यावर अचूक लैंगिक माहिती मिळवणं कठीण जातं. इतर मुला/मुलींच्या तुलनेत अंध व कर्णबधिर तरुण/तरुणींमध्ये कमी प्रमाणात लैंगिक ज्ञान असण्याची शक्यता असते. एका कर्णबधिर व्यक्तीने मला लिहून दिलं, “मी जेव्हा वयात आलो तेव्हा या विषयाची मला काहीही माहिती नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यावर चर्चा-गप्पा मारताना सुद्धा नीट समजायचं नाही. कारण ऐकू व बोलता येणारे मित्र आपापसात गप्पा मारताना सेक्सबद्दल बोलत असले तरी माझ्याबरोबर असताना मात्र ते फक्त जनरल विषय काढायचे. पुढे मला वयाने मोठे असलेले इतर कर्णबधिर मित्र भेटले तेव्हा हे चित्र बदललं, कारण आम्ही सगळे एकाच वयाचे नव्हतो. वयात अंतर होतं. त्यामुळे इतर मोठी मुलं मला या गोष्टी समजवायला लागली. मला हस्तमैथुन म्हणजे काय हेसुद्धा माहीत नव्हतं. मला माझ्या मित्रांनी, 'मी हस्तमैथुन करतो का?' विचारलं. मला याचा अर्थही माहीत नव्हता. त्याने माझ्यासमोर हस्तमैथुन केला. मी तसं केल्यावर मला ते आवडलं. तो म्हणाला, की “तू इतकी वर्ष हे केलं नाही, वाया गेली बघ एवढी वर्ष.' मित्रांकडून लैंगिक ज्ञानात थोडी भर पडते पण चुकीची माहिती मिळून गैरसमजही निर्माण होतात. काही वेळा या विषयावरची एकमेकांची चेष्टा करूनही गैरसमज पसरतात. 'तू तुझं वीर्य कानात घाल म्हणजे तुला ऐकू यायला लागेल.' किंवा 'तुला मुल होत नाही का? तुझ्या बायकोने तुझं वीर्य गिळलं की तिला 7 ११८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख