पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" प्रमाणात ती प्रगल्भता असते त्यांना त्या लैंगिक इच्छा कुठे व्यक्त करायच्या हे औचित्य नसतं. त्यांना शिकवायला लागतं, की जर लिंगाला ताठरपणा आला किंवा लिंगाला हात लावायचा असेल तर आतल्या खोलीत जायचं. अंघोळ केल्यावर बाहेर येताना मुला/मुलीने चड्डी घालूनच बाहेर यायचं. हे शिकवायला बराच काळ लागू शकतो व सर्वजण शिकतीलचं असं नाही. मुलगी वयात आल्यावर, 'पाळी सुरू होणं म्हणजे काय?', 'पाळीचं रक्त आलं तर काय करायचं', कापडाच्या घड्या/सॅनेटरी पॅड्स' कुठे ठेवले आहेत? त्यांचा वापर कसा करायचा, नंतर त्या कापडाचं/नॅपकीनचं काय करायचं अशा सगळ्या गोष्टी मुलींना शिकवाव्या लागतात. बाहुलीच्या मॉडेल्सचा वापर करून पाळीच्या वेळी कुठून रक्त येतं हे दाखवणं, बाहुलीच्या चड्डीवर लाल ठिपका काढून चड्डीवर रक्ताचे डाग दाखवणं अशा विविध मार्गांनी पाळीची माहिती दयावी लागते. आपल्या कुवतीप्रमाणे मुली या गोष्टी शिकतात. संध्या देवरूखकर म्हणाल्या, “अशा वेळी आजूबाजूच्या लोकांनीही मुला/मुलींचं वेगळेपण समजून घेणं गरजेचं असतं. संवेदनशीलता असावी लागते, जी दुर्दैवानं अनेक वेळा नसते. मला आठवतंय की एकदा मुलीला पाळी आली व शाळेतल्या चादरीवर रक्ताचे डाग पडले, तर शिक्षिकांनी तिच्या आईला बोलावून घेतलं व म्हणाल्या, “हे बघा तुमच्या मुलीनं काय केलयं ते. आता चादर धुऊन आणा.' पाळीचा प्रश्न सुटावा व गर्भधारणा होऊ नये म्हणून काही पालक मुलींचं गर्भाशय काढायचा निर्णय घेतात. गर्भाशय काढायचं की नाही हा पालकांना 'गार्डीयन' म्हणून हक्क असला तरी हा वादाचा मुद्दा मानला जातो. मतिमंद मुलींच गर्भाशय काढण्याला काहीजणांचा विरोध असतो. गर्भाशय काढलं तर त्या मुलीच्या मानवी अधिकारांवर गदा येते. त्याचबरोबर अशा मुलीचं लैंगिक शोषण सहजपणे होईल ही त्यांना भीती असते. कारण गर्भाशय काढलं की, शोषण करणाऱ्याला त्या मतिमंद स्त्रिला गर्भधारणा होईल याची भीती उरत नाही. काही उदाहरणं दिसतात जिथे, पालकांना आपल्या खूप मतिमंद असलेल्या मुला/मुलींचं लग्न लावायची इच्छा असते. त्यांनी वस्तुस्थितीचा परिपूर्ण विचार केलेला नसतो. कोणत्याही मार्गाने सुटका करून घ्यायची असते. मृदुला दास म्हणाल्या ,“मला एकजण म्हणाले (ज्यांची मुलगी खूप मतिमंद आहे) माझ्या मुलीचा निकाह केलाच पाहिजे. त्याशिवाय तिला जन्नत मिळणार नाही.' लग्न झाल्यावर कोणत्या अडचणी येतील? नवरा आपल्या बायकोला प्रेमाने सांभाळेल का? अशा कोणत्याच गोष्टींचा विचार या गृहस्थांनी केला नव्हता. संध्या देवरूखकर म्हणाल्या, “पूर्वी 'माईल्ड' मतिमंद मुला/मुलींना एकत्र " " मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ११७