पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लावून या भेगा घालवता येतात. दररोज संडास करावी लागत असल्यामुळे या भेगा भरून निघण्यास कालावधी लागू शकतो. मलावरोध (कॉन्स्टिपेशन) असलेल्यांना हा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. गुदमैथुन करून घेणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाला जर 'फिशर' असेल तर संभोगाच्या वेळी गुदाला कळ लागून खूप त्रास होऊ शकतो. मूळव्याध (पाईल्स) आपल्या गुदद्वाराच्या आतल्या बाजूला रक्तवाहिन्या असतात. काहीजणांमध्ये या रक्तवाहिन्या फुगतात. त्या का फुगतात याची कारणं अजून नीट समजली नाहीत. पण त्या जर फुगल्या व त्यांच्यावर दाब पडला/घर्षण झालं तर दुःखतं. संडास करताना मळ कडक असेल तर घर्षणानं रक्त येतं. काही वेळा त्या वाहिन्या गुदद्वारातून बाहेर डोकावतात. जर मूळव्याध झाली तर तिचा त्रास कमी व्हावा म्हणून अॅलोपथिक डॉक्टर सूज कमी करण्यासाठी गुदद्वारास लावण्यास औषधं देतात. फार त्रास वाढला तर शस्त्रक्रिया करून या फुगलेल्या वाहिन्या काढून टाकाव्या लागतात. मलावरोध (कॉन्स्टिपेशन) असलेल्यांना हा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून भरपूर पाणी पिणं व हिरव्या पालेभाज्या खाणं (हाय-फायबर डाएट) गरजेचं असतं. फार तिखट खाणाऱ्यांना मूळव्याध झाली तर संडासच्या वेळी जास्त वेदना सोसावी लागते. गुदमैथुन करून घेणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाला जर मूळव्याध असेल तर संभोगाच्या वेळी लिंगाच्या घर्षणामुळे जास्त वेदना व रक्तस्राव होतो. संभोगाच्या समस्या नपुंसकत्व (इंपोटन्स) काही पुरुषांच्या लिंगाला ताठरपणा येत नाही. लिंगाला ताठरपणा आला नाही तर संभोग करता येत नाही. याला नपुंसकत्व म्हणतात. लिंगाला ताठरपणा न येण्याचे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत- ऑरगॅनिक जर वयात आल्यावर लैंगिक इच्छा होऊनही लिंगाला ताठरपणा येत नसेल तर याला काही शारीरिक आजार कारणीभूत असू शकतात. लिंगातील रक्तवाहिन्यांत काही अटकाव असेल तर लैंगिक उत्तेजनाच्या वेळी लिंगात जास्त प्रमाणात रक्त जाण्यास अडचण येते. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ९७ 6