पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक समस्या "अंडवृद्धी म्हणजे काय?" किंवा "माझा धातू लगेच गळतो, त्याच्यावर काही औषध आहे का?" अशा त-हेचे अनेक प्रश्न मला हेल्पलाईनवर विचारले जातात. काही प्रश्न लैंगिक अवयवांशी निगडित असतात, काही संभोगाशी. अशा काही मोजक्या प्रश्नांची थोडक्यात माहिती खाली दिली आहे. लैंगिक अवयवांवरचे प्रश्न , 9 लिंग खूप वाकडं असणं (कॉर्डी) अनेक पुरुष मला विचारतात, की "माझ्या लिंगाला बाक आहे, मला संभोग करताना काही अडचण येईल का?" बहुतेक पुरुषांच्या लिंगाला बाक असतोच. फार थोड्या पुरुषांचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे लिंग-योनीमैथुनाच्या वेळी काही अडचण येत नाही. संभोग करतेवेळी जर लिंगाला वेदना होत असेल तरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. क्वचित केसेसमध्ये लिंगाचा बाक खूप वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत प्रवेश करताना अडचण येते. याला 'कॉर्डी' म्हणतात. शस्त्रक्रिया करून किंवा 'ॲड्रोपेनिस' उपकरणाचा वापर करून (बघा, सत्र-लैंगिक उपकरणं) लिंगाचा बाक कमी करता येतो. वृषणांच्या वाहिन्यांना पीळ बसणं (टेस्टिक्यूलर टॉर्शन) जर काही कारणाने एक किंवा दोन्ही वृषणांच्या वाहिन्यांना पीळ बसला, तर त्या वृषणाचा रक्तपुरवठा बंद होतो. वृषण सुजतं. खूप वेदना होते. ही गंभीर बाब आहे, व तातडीनं डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. डॉक्टर शस्त्रक्रिया करून वृषणाच्या वाहिन्यांचा पीळ सोडवतात व वृषणाला परत पीळ बसणार नाही याची व्यवस्था करतात. या शस्त्रक्रियेच्या वेळी दुसऱ्या वृषणावरही (ज्याला पीळ बसलेला नाही) मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ९३