पान:माझे चिंतन.pdf/४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नरोटीची उपासना २७ 

चूक आहे हे ध्यानात घेऊन आपण सतत जागरूक राहिले पाहिजे. लोकशाहीला अखंड जागरूकता, सावधानता अवश्य असते, असे नेहमी म्हणतात. पण कोणत्याही समाजव्यवस्थेला या सावधतेची आवश्यकता आहे असे दिसून येईल. आपल्या डोळ्यांवर क्षणभर जरी झापड आली, मुहूर्तभर जरी आपण बेसावध राहिलो तरी आपल्या हातातले श्रीफल नाहीसे होऊन नरोटी तेवढी शिल्लक राहील. म्हणून—

न हि प्रमादात् परमस्ति कश्चित् । वधो नराणामिह जीवलोके ।
प्रमत्तमर्था हि नरं समन्तात् । त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति ॥

(या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा घातक असे काहीच नाही. बेसावध मनुष्याला सर्व प्रकारचे वैभव सोडून जाते व त्याला आपत्ती चहू बाजूंनी घेरतात.) महाभारत - सौप्तिकपर्व १०।१९
 या वचनाची जाणीव नित्य ठेवून आपल्या समाजरचनेच्या तत्त्वांना जडरूप येऊ नये अशी आपण सतत चिंता वाहिली पाहिजे.

नोव्हेंबर १९५३