पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
९०]

[माझा जन्मभरचा


घातले असल्यामुळे, हास्यास्पदतेंत माझ्या 'अुत्तरा'ने भारतांतील अुत्तरावर ताण केली आहे. परंतु पुढे युद्धावरून परत आल्यावर त्यानें आपला सत्कार-समारंभ चालला असतां जो आत्मनिषेध केला, तो भाग मूळ भारतांत नाही; व या प्रसंगाच्या भाषणावरून अुत्तराच्या पूर्वीच्या थिल्लरपणाचें परिमार्जन होअून, त्याच्या मनांत येणाऱ्या पश्चात्तापात्मक सद्विचारांनी त्याच्या स्वभावरचनेंत पुढे थोडासा अुठावदारपणा आलेला आहे. रंगशाळेंत बृहन्नडा वेषांत असलेल्या अर्जुनाकडून अुत्तर हा नृत्यगायनाचे पाठ घेत असल्याची कल्पना, व असें थिल्लरपणाचें आचरण तो करीत असतां त्याच्या तोंडून मोठमोठ्या वीरांची तुच्छतागर्भ निन्दा, मी करविली आहे. तो भाग लिहितांनाहि मला मोठी मौज वाटली. पण लाकूड हातभर आणि ढलपी सवाहात असा प्रकार पुष्कळदा नाटकाचा प्रयोग करतांना होत असतो. तसाच या नाटकासंबंधाने थोडासा झाला. कारण नृत्यगायनाचे पाठ घेतांना अुत्तराने घेतलेला अर्धवट स्त्रीवेष व त्याचें अभिनयशिक्षण, यांच्यामुळे कथानकगुणाने त्या प्रवेशाला आधीच हलकेपणा येणारा असून, अुत्तराचें काम करणारा मुलगा फाजील हुशार असल्यामुळे एखादे वेळीं त्याच्या हातून त्या प्रवेशाच्या एका भागाला फारच ग्राम्य स्वरूप येई. म्हणून मला नाटकमंडळीला वरचेवर बजावून सांगावें लागे कीं ' कृपा करा व हा प्रवेश अशा रीतीनें अितका रंगवू नका.' कारण तो अितका विकृत करावा असें माझ्या मनांत मुळांत नव्हतें व तें दिसण्यांतहि चांगले दिसत नाही. नाट्यांत कांहीं प्रकार सद्भिरुचीला सोडून होअी. नाटकाच्या अुत्तरभागांत द्रौपदीकडून विराटनगरींचें रक्षण, हातांत हत्यार घेऊन व स्त्रियांना सैनिक बनवून, केल्याचें मी दाखविलें आहे तें अर्थात् सर्वच काल्पनिक आहे. शकुनीमामाची फजिती झालेली मी नाटकांत दाखविली आहे ती केवळ कथानकाचा जम बसविण्याकरिता. त्याला मुळांत कांही आधार नाही. तसेंच पांडवांच्या शोधाकरिता शकुनीने पाठविलेले गुप्तहेर त्याजकडे परत येअून आपल्या फसलेल्या कामगिरीचें वर्णन करतात असा अेक प्रवेश घातला आहे. त्यांत सरकारी गुप्त पोलिसखात्याचे लोक भत्ते कसे अुपटतात, हवा तितका खर्च कसा करतात, व त्यांतले कांही स्वार्थसाधु तर कांही अगदी मूर्ख कसे असतात, याची जी ओक कल्पना करतां येण्यासारखी आहे ती या प्रवेशांत