पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
५८]

[माझा जन्मभरचा


भाषापद्धतींत किती फरक राहिला हें रा. गजानन विश्वनाथ केतकर यांच्या शब्दांनी वर दिलेंच आहे. अुलट, मी जसें या बाबतींत कोणाला गुरु केलें नाही त्याप्रमाणें मी कोणाचा गुरुहि होअूं शकलों नाही. कारण माझा 'सांप्रदाय' बनण्यासारखें 'वैशिष्ट्य' मजमध्ये नाही. रा. श्री. कृ. कोल्हटकर यांनी आपला असा अेक ' सांप्रदाय' प्रस्थापित केला आणि गडकरी, खांडेकर हे त्यांचे शिष्य होत, हें जसें यथार्थपणें म्हणतां येतें, तसें माझ्यासंबंधाने कोणाविषयी म्हणतां येणार नाही असें वाटतें. कोल्हटकरांप्रमाणें केवळ विनोद आळविण्याकरिता अेकहि लेख मी लिहिलेला नाही. रा. कोल्हटकर हे विनोदी लेखक, आणि माझ्याहि लेखांत मधून मधून विनोद असतो, यावरून कांही तरुण लेखकांनी मला कोल्हटकर यांच्या सांप्रदायांत गोवून त्यांचा शिष्यहि बनविलें आहे ! पण तें त्यांच्या अज्ञानामुळे होय. वस्तुस्थिति मुळीच तशी नाही, म्हणून त्याचा मुद्दाम उल्लेख केला आहे.
 (४७) आणि माझ्या वाङ्मयांतील विनोदाचें वर्णन रा. वि. स. खांडेकर यांनी केलें आहे तेंच येथें देतों. कारण ते विनोदाचार्य कोल्हटकर यांचे शिष्य असून, स्वतः विनोदी वाङमय लिहिणारे आहेत, म्हणून या अभिप्रायाला महत्त्व येतें--
 “ केळकरांच्या प्रतिभेच्या म्यानांत काव्य व विनोद या दोन्ही तलवारी राहूं शकतात हें खरें. पण म्यानांत दोन तरवारी असल्या तरी त्यांतली अेक सैनिकाची अधिक आवडती व्हावी यांत अस्वाभाविक असें काय आहे ? त्या दृष्टीने पाहिलें तर केळकरांच्या बुद्धीचा स्वाभाविक कल काव्यापेक्षा विनोदाकडेच दिसतो. त्यांच्या व्याख्यानाला जाणारा वर्तमानपत्राचा प्रतिनिधि, को-या कागदावर मधून मधून हंशा हे शब्द, घरूनच लिहून गेला तरी चालण्यासारखें असतें. 'संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवना' सारखा गंभीर विषय ! पण त्यांतहि त्यांची सूक्ष्म विनोदबुद्धि, रणभेरी वाजूं लागल्या असतांनाहि सतार छेडणाऱ्या सव्यसाची सेनापतीप्रमाणें, सलील विहार करूं शकते.
 "काव्य काय अगर विनोद काय, दोन्हीचीहि बुद्धि मनुष्याला अुपजतच असावी लागते. आंधळयाला कितीहि जाड कांचांचा चष्मा दिला,